आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारंवार समन्स बजावूनही हजर झाले नाही संत रामपाल; महिला समर्थकांना बनविले ढाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: सतलोक आश्रमाबाहेरमोठ्या संख्येने उपस्थित झालेले महिला समर्थक)

हिसार/बरवाला- ज्यूनियर इंजीनिअर पदावरून निलंबित झालेले आणि नंतर 'संत' बनलेले रामपाल सोमवारीही कोर्टात हजर होणार नाही. राजपाल यांनी कोर्टात आपला मेडिकल रिपोर्ट पाठवून दिला आहे. रामपाल यांच्या वकीलांनी कोर्टात सांगितले की, रामपाल यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते कोर्टात उपस्थित राहू शकणार नाहीत. तसेच रामपाल यांना अटकेची शक्यता असल्याने संत रामपाल यांच्या महिला समर्थकांनी पोलिसांच्या विरोधात आश्रमाबाहेर ठिय्या मांडला आहे. तसेच शस्त्रधारी खासगी कमांडो तैनात करण्यात आले आहेत.

दुसरीकडे, रामपाल यांना अटक करण्यासाठी पोलिस रविवारी (9 नोव्हेंबर) सतलोक आश्रमात पोहोचले होते. परंतु, हजारोंच्या संख्येने उपस्थित झालेल्या समर्थकांनी पोलिसांना आश्रमाच्या प्रवेशद्वारावर रोखले होते. शस्त्रधारी खासजी कमांडो आश्रमाच्या बाहेर तैनात करण्यात आले आहे. खासजी कमांडो आश्रमाच्या जवळपास एक किलोमीटर अंतरपरिसरात तैनात करण्यात आले आहेत.

जमीन गैरव्यवहार आणि हत्‍येप्रकरणी वारंवार समन्स बजावूनही रामपाल हे कोर्टात हजर झाले नाही. कोर्टाने रामपाल यांना आज (सोमवारी, 10 नोव्हेंबर) कोर्टात हजर राहाण्याचे आदेश द‍िले होते. परंतु, पोलिसांनी रामपाल यांना अटक करण्यात दिरंगाई करत असल्याचाही आरोप होत आहे. रामपाल यांच्या समर्थनार्थ त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरल्याने पोलिस प्रशासनाची गोची झाली आहे. त्यामुळे सतलोक आश्रमापासून जवळपास 25 किलोमीटर अंतरावर पोलिसांनी अतिरिक्त कुमक तैनात ठेवावी लागली आहे. तरीदेखील पोलिस रामपालला अटक करण्यास ठोस पाऊले का उचलत नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

चंदीगडमध्ये पोलिस प्रशासन सज्ज...
चंदीगडमधील हिसारमध्ये रामपाल यांच्या समर्थनार्थ सुमारे 50 हजार समर्थकांनी त्यांच्या आश्रमाबाहेर ठिय्या मांडला आहे. तसेच रामपाल यांचे आणखी समर्थक हिसारमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर चंदीगड पोलिसही सज्ज झाले आहेत. आज (सोमवारी) पहाटे 4 वाजता शहरातील सगळे एंट्री प्वाइंट, रेल्वे स्टेशन आणि हायकोर्ट परिसरात 5 हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. रामपाल यांचे समर्थक मोठ्या संख्येने चंदीगडमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हाउसिंग बोर्डजवळ, रेल्वे लाइट प्वाइंट आणि हायकोर्ट मार्गावरील वाहतूक दुसर्‍या मार्गाने वळवली जाणार आहे. चंदीगड रेल्वे स्टेशनवरील एंट्री बंद करण्यात आली आहे. स्टेशनवर जीआरपीचे 150 महिला कॉन्स्टेबल आणि 450 पुरुष कॉन्स्टेबल तैनात करण्यात आले आहेत. जीआरपीचे 50 अधिकार्‍यांनाही तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान, सतलोक आश्रमाचे संचालक रामपाल यांनी रविवारी शासन आणि प्रशासनाना स्वत:ची ताकद दाखवून दिली. शस्त्रधारी खासजी कमांडो आश्रमाच्या बाहेर तैनात करण्यात आले आहे. खासजी कमांडो आश्रमाच्या जवळपास एक किलोमीटर अंतरपरिसरात तैनात करण्यात आले आहेत.
रामपाल यांचे शक्तीप्रदर्शन पाहून पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच रामपाल यांनी समर्थक महिला आणि चिमुरड्यांनाही ढाल बनवले आहे. रामपाल यांच्या समर्थनार्थ शेकडो महिलांनी आपल्या चिमुरड्यांना कुशीत घेऊन आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला आहे. रामपाल यांचे समर्थक हातात बॅनर घेवून करोथा कांडाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. एवढेच नव्हे तर न्यायमूर्तीचे नावे बॅनरवर लिहून वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी केली आहे.
रविवारी दुपारी दोन वाजेपर्यत महिला आश्रमाबाहेर बसल्या होत्या. नंतर त्यांना आश्रमात पाठवून देण्यात आले. तसेच आश्रम परिसरात खासगी शस्त्रधारी कमांडो तैनात करण्यात आले आहेत.

सतलोक आश्रमाबाहेरील फोटो पाहाण्यासाठी क्लिक करा, पुढील स्लाइड्‍सवर...