आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटिंगच्या आधी अशी तयारी करायची सिंगर सपना: पाहा, तिचे Unseen Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानीपत/दिल्ली- जाट आंदोलनानंतर सपना चौधरीचा आत्महत्येच्या प्रयत्नाचे दुसरे प्रकरण आहे. आता याप्रकरणी चर्चेला उधान आले आहे.सिंगिंग आणि डान्सिंगच्या जोरावर सपना हिने हरियाणात उत्कृष्ट आर्टिस्टचा बहुमान मिळवला आहे. घटनेनंतर सोशल मीडियावर सपनाशी संबंधित अनेक UNSEEN फोटोज शेअर झाले आहेत.

यातील बहुतांश फोटोज तिच्या शूटींगच्या आधीचे आहेत. त्यात ती तयारी करताना दिसत आहे. तिचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यात ती कारमध्ये हात वर करून डान्स करताना दिसत आहे. सोशल मीडियावर तिचे अश्लील फोटोज पोस्ट झाल्यानंतर ती संतापली आणि तिने आत्महत्येचा प्रयत्न केला.

दरम्यान, काही दिवसांंपूर्वी चर्चेत आलेली हरियाणाची डान्सर आणि सिंगर सपना चौधरी हिच्‍या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तिने सांगितले की, सोशल मीडियावर तिच्‍या बाबतीत दररोज अश्‍लिल पोस्‍ट केले जात होते. या पोस्‍टला वैतागून तिने आत्‍महत्‍येचा प्रयत्न केला होता.

प्रकृतीत सुधारणा, जनरल वार्ड शिफ्ट केले...
- सपनाच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. रविवारी तिला आयसीयूतून जनरल वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आले.
- उनके प्रवक्ता व ड्राइवर कदम सिंह ने उनके बारे में सोशल मीडिया पर चल रही खबरों को अफवाह बताया है।
- कहा यह भी जा रहा है कि जबतक सपना पूरी तरह ठीक नहीं हो जातीं उन्हें अस्पताल में ही रखा जाएगा।

सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत व्‍हिडिओ....
- सपनासोबत लाईव्‍ह कार्यक्रमात कित्‍येक वेळा अश्‍लिल चाळे केले जात होते.
- त्‍या कार्यक्रमांचेे काही व्‍हिडिओ तिच्‍या आत्‍महत्‍येच्‍या प्रयत्‍नानंतर सोशल मीडियावर व्‍हायरल झाले होते.
- या व्‍हिडिओसंदर्भात वादग्रस्‍त विधानेही केली जात आहेत.
- सपनाने यासंदर्भात गुडगाव पोलिसांंत तक्रारही केली आहे.
- मात्र, अजूनही हे व्‍हिडिओ सोशल मीडियावरून हटवण्‍यात आले नाहीत.
नेमकं काय आहे हे प्रकरण...?
सपनाने तीन महिन्‍यांपूर्वी गायिलेल्‍या एका गाण्‍यातून दलितांचा अपमान झाला, असा आरोप तिच्‍यावर आहे. या प्रकरणी 'निगाहें' या सामाजिक संस्‍थेचे अध्‍यक्ष नबाव सतपाल तंवर यांनी दिलेल्‍या तक्रारीच्‍या आधारे गुडगाव पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल झाला.

- यापूर्वी तिच्‍याविरुद्ध डोगरान पोलिस चौकीतही तक्रार दिली गेली होती.
- या तक्रारीत म्‍हटले, गुडगावच्‍या चक्करपूर परिसरात झालेल्‍या एका कार्यक्रमात सपना आणि तिच्‍या पथकाने रागिनी शैलीमध्‍ये 'जात-पात का बिगड़ग्या' हे गीत गावून दलितांचा अपमान केला.
- या गीतात जातीवाचक शब्‍द होते.
- सपनाचे हे वादग्रस्‍त गाणे यू-ट्यूबवरही अपलोड केले गले.
- या प्रकरणी संजय चौहान नावाच्‍या एका युवकानेही तक्रार दिली होती.

सपनाने सुसाइड नोटमध्‍ये काय लिहिले ?
- सतपाल तंवर याने माझी बदनामी केली, असा आरोप सपनाने सुसाइड नोटमध्‍ये केला.
- कट रचून माझ्याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. यापूर्वी अनेक गायकाने हे गाणे गायलेले आहे. त्‍यांच्‍यावर कुणीच आक्षेप घेतला नाही. एवढेच नाही तर मी माफीसुद्धा मागितली होती. तरीही फेसबूकवर मला शिव्‍या घातल्‍या जात आहेत. माझ्या चरित्रावर संशय घेऊन कंमेट केल्‍या जात आहेत. त्‍यामुळे मी त्रस्‍त झाली आहे.
- या प्रकरणी मुख्‍यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मला न्‍याय मिळवून द्यावा, अशी मागणीसुद्धा तिने केली आहे.

सतपालविरुद्ध गुन्‍हा दाखल
सतपालविरुद्ध आत्‍महत्‍येस प्रवृत्‍त केल्‍याचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

या पोस्‍टमुळे सपना झाली खूप व्‍यथित?
सपनाने सुसाइड नोटमध्‍ये लिहिले, ''आज सकाळी मी फेसबूकवर एक पेज पाहिले. यावर लिहिले होते, सपना चौधरीची धमकी- नेते आणि अधिकाऱ्यांना करेल भोंगळे. ' यात मला धरून खूप काही आक्षेपार्ह लिहिलेले होते. त्‍यामुळे मी खचून गेली.
- त्‍यातील मजकूर वाचून मी आतल्‍या आत मरून गेली. माझ्यावर उडवलेले शिंतोडे पाहून जगण्‍याची इच्‍छा संपली. या पेजवर लिहिले होते, मोठे अधिकारी माझ्या शरिराशी खेळतात. स्टेजवर मी श्रोत्‍यांना खूश करते तर रात्री मंत्री आणि अधिकाऱ्यांना. पण, मी असे काहीही केलेले नाही.
- सतपाल तंवरनेच मला बदनाम करण्‍यासाठी हा कट रचला आहे, असा आरोपही तिने केला.
पुढील स्लाइडवर वाचा, पुढील स्लाइड्‍सवर पाहा सपना चौधरीचे निवडक फोटोज आणि 'तो' व्हिडिओ... त्यात तिने कारमध्ये हात वर करून डान्स केला होता...'ते माझ्या अब्रुसोबत खेळत होते, मी काय करायचे होते...?'

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तरURLम्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...