आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sarabjeet Singh Daughters Get Government Service To Punjab Government

सरबजितच्या कुटुंबीयांना दिलासा: थोरली नायब तहसीलदार, धाकटी शिक्षिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिखीविंड- सरबजित सिंग यांचा श्रद्धांजली कार्यक्रम त्यांचे मूळ गाव भिखीविंड येथे शनिवारी पार पडला. त्या अगोदर पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक कोटी रुपयांची मदत दिली. त्याचबरोबर मोठ्या मुलीस नायब तहसीलदार तर छोटीला शिक्षिकेचे पद देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

शनिवारी सरबजित सिंग यांच्या घरी अखंड पाठ साहिबच्या भोगनंतर अखेरचे अरदास करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री बादल यांनी एक कोटी रुपयांचा चेक कुुटुंबीयांना भेट दिला. शहिदाच्या सन्मानापुढे ही रक्कम खूप कमी आहे; परंतु कुटुंबाला कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही.
सरबजित यांची पत्नी सुखप्रीत कौर यांना 25 लाख, बहीण दलबीर कौरला 25, मोठी मुलगी स्वप्नदीप, लहानी पूनम यांनाही प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत देण्यात आल्याचे बादल यांनी सांगितले. स्वप्नदीप बी.ए. पास आहे. त्यामुळे तिला नायब तहसीलदाराची नोकरी देण्यात आली आहे. पूनमचे शिक्षण कमी असल्याने सध्या तिला शिक्षिकेची नोकरी देण्यात आली आहे.

दोघींनी नोकरीसाठी अर्ज केला पाहिजे. त्यांनी आपल्या शिक्षणानुसार आमदार विरसा सिंग वल्टोहा आणि डी.सी. रजत अग्रवाल यांच्याकडे फाइल सोपवावी. त्यांना तत्काळ नोकरीची ऑर्डर मिळेल, असे आश्वासन बादल यांनी दिले. दरम्यान, दलबीर यांनी गावात सरबजितच्या नावावर 100 बेडचे रुग्णालय सुरू करण्याची मागणी केली. त्यावर लवकरच विचार करण्याचे आश्वासन बादल यांनी दिले.