आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saradha Scam Money May Use For Terrorist Activity Intelligence Bureau

शारदा घोटाळ्याचा पैसा अतिरेकी कारवायांसाठी, गुप्तचर संस्थेचे गृहमंत्रालयाकडे अहवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - पश्चिम बंगालमधील बर्धमान येथे बॉम्बस्फोट घडवून आणणा-या दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणावरील खर्च शारदा घोटाळ्यातून झाल्याचा खळबळजनक संशय गुप्तचर संस्थांकडून व्यक्त केला जात आहे.

इंटेलिजन्स ब्युरोने गृहमंत्रालयाला पाठवलेल्या अहवालात याविषयी माहिती दिली आहे. घोटाळ्याचा तपास करणा-या अंमलबजावणी संचालनालयातील (ईडी) अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, शारदा समूहाने ६० कोटी रुपये बांगलादेशातील इस्लामी बँकेत ट्रान्सफर केले होते. ही बँक जमात-उल-मुजाहिदीन-बांगलादेश (जेएमबी)शी जवळीकतेसाठी ओळखली जाते. ईडीने तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर नुकतेच राज्यसभेत सदस्य बनलेले अहमद हसन इम्रान यांची चौकशी केली. अहमद हसन ‘कलम’ या उर्दू साप्ताहिकात काम करत होते. दोन वर्षांपूर्वी शारदा कंपनीने ‘कलम’ खरेदी केले आणि ते दैनिक स्वरूपात प्रकाशित होऊ लागले. दैनिकाची विक्री खूप वाढली.

हसन सिमीचे सदस्य
हसन हे १९७७ ते १९८४ दरम्यान सिमीचे सदस्य होते, हे त्यांनीच मान्य केले आहे. मात्र, त्या काळात सिमीवर बंदी नव्हती. बंदी २००१ मध्ये लागली. हसन यांचा आरोप आहे की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अर्धे भाजप खासदार ‘संघा’वर बंदी असताना त्याचे सदस्य होते. - १९४८, १९७५, १९९२ मध्ये.. त्यांना मान दिला जातो, तर माझ्यावर संशय का घेतला जातो?’ मात्र, तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवरील आरोपांबाबत हसन प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत आहेत.