आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sarah Abdullah And Sachin Pilot Love Story On Valantine Day News In Marathi

Valentine Day: धर्माच्‍या भिंती ओलांडून फुलले सचिन आणि सारामधील प्रेम!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- प्रेमाच्‍या वाटेवर फुले कमी आणि काटे अधिक असतात. प्रेमीयुगुल जर आंतरजातीय अथवा अांतरधर्मिय असेल तर विचारुच नका. प्रेमीयुगुलाला एकत्र आणण्‍यापेक्षा त्यांना विभक्त करण्‍यावरच जवळपास सगळ्यांचा भर असतो. मात्र, खरं प्रेम असेल तर त्‍याला जात-पात, धर्म, पंथ कधीच आडवा येऊ शकत नाही. शेवटी प्रेमाचा विजय होतो. असेच उदाहरण आहे माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट आणि त्यांची पत्नी सारा यांचे...


जम्मूमधील अब्दुल्ला या राजकीय घराण्यातील मुलगी सारा आणि राज्‍यस्‍थानमधील माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट यांची 'प्रेमकहानी' एखाद्या सिनेमाच्या कथानकाला लाजवणारी आहे. सारा या फारुक अब्दुल्लांच्या कन्या असून जम्मूचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाच्या भगिनी आहेत. सचिन हिंदू आणि सारा मुस्लिम.

सचिन आणि सारा दोघांची लंडन येथे ओळख झाली. लंडनमध्येच दोघांचे शिक्षण झाले. पहिल्‍या नजरेत दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रेम यशस्वी करण्‍यासाठी दोघे विवाहासाठी उत्‍सुक होते. दोन्ही घराणे एमकेकांचे कट्टर विरोधक, अशा वातावरणात सचिन आणि सारा यांचे प्रेम फुलले.

अखेर सिनेमाचा शेवट जसा गोड होतो, अगदी तसेच सारा अब्‍दुल्‍ला आणि सचिन पायलट एकत्र आल्या.

अब्दुल्ला परिवाराचा सचिन-साराच्‍या लग्‍नाला विरोध
सचिन पायलट आणि सारा अब्दुल्‍ला लंडनमध्‍ये शिकत असताना दोघांमध्‍ये प्रेम झाले. दोघांनीही लग्‍नाचा विचार आपापल्‍या घरी सांगितला. सचिनच्‍या घरचे तयार झाले. परंतु जम्मू-कश्मीरचे के मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा परिवार मानायला तयार नव्‍हते. सचिननेही धर्म,राजकारण, सामाजिक वातावरण सर्वांना छेद देत सारासोबत लग्‍न करण्‍याचे निश्चित केले.

खासदार बनल्‍यानंतर अब्दुल्लाने पायलटला स्विकारले
सचिन पायलटने वयाच्‍या 26 व्‍या वर्षी लोकसभा निवडणुकीत स्‍वताला अजमावले. आणि खासदार म्‍हणून निवडून आले. सचिन खासदार बनल्‍यानंतर अब्दुल्‍ला परिवाराचा विरोध मावळला. आणि अब्दुल्‍लाने सचिनचा जावाई म्‍हणून स्विकार केला. 15 जानेवारी 2014 रोजी दोघांचे लग्‍न झाले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, सचिन आणि साराची निवडक छायाचित्रे...