आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखंड भारताचे शिल्पकार सरदार पटेल यांच्या आठवणी, पाहा दुर्लभ PHOTO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : डावीकडून लॉर्ड आणि लेडी माउंटबेन, सरदार पटेल यांची कन्या मणिबेन, जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल

अहमदाबाद - भारतात आता राजकीय नेते करोडपती असणे म्हणजे फार मोठी बाब नाही. पण अखंड भारताचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल एक असे राजकारणी होते ज्यांची कशाबरोबरही तुलना होऊ शकणार नाही. सरदार पटेल यांचे जेव्हा निधन झाले होते, त्यावेळी त्यांच्या खात्यामध्ये केवळ 260 रुपये होते. ही सध्याच्या राजकारण्यांसाठी आश्चर्याची बाब असू सकते.

ज्यांनी भारताला अखंड रुप प्रदान केले ते सरदार पटेल हेच होते. नसता भारताचे जवळपास 500 हून अधिक तुकडे झाले असते. 31 ऑक्टोबर 1875 ला गुजरातच्या नाडियाडमध्ये जन्मलेल्या या महान व्यक्तीने आजच्याच दिवशी म्हणजे 15 जिसेंबर 1950 ला या जगाचा निरोप घेतला होता.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947 मध्ये देशाच्या पहिल्या गृहमंत्री पदावर विराजमान झालेल्या सरदार पटेल यांनी ख-या अर्थाने सरदार बनत देशातील विखुरलेल्या लहान मोठ्या संस्थानांना एकत्र जोडले. असे करणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. पण एक कुशल राजकारण्यांप्रमाणे त्यांनी सर्वकाही सांभाळले. साम-दाम दंड-भेद सर्व पद्धतींनी त्यांनी या अखंड भारताची रचना केली.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सरदार पटेल यांचे काही दुर्लक्ष PHOTO