आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SAREGAM Little Champ Fame Shradha Das Blame On Her Husband And Father

लिटिल चॅम्प फेम श्रद्धाला पतीकडून मारहाण; बळजबरीने करवून घेतला गर्भपात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमशेदपूर/ रांची- सारेगामापा लिटिल चॅम्प फेम आणि रामनगर(कदमा) येथील रहिवासी श्रद्धा दास हिने खळबळजनक खुलासा केला आहे. पती मृत्युंजय सिन्हा आणि वडील रमेशचंद्र दास यांच्याकडून श्रद्धाच्या जीवाला धोका असल्याचे पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मृत्युंजय सिन्हा तिला जबर मारहाण करतो तसेच वडील रमेशचंद्र दास यांनी तिला घरात बंदी बनवून ठेवले होते. एवढेच नाही तर दोघांनी बळजबरीने तिला गर्भपात करण्‍यासही प्रवृत्त केल्याचा आरोप श्रद्धाने केला आहे. परंतु काही वेळातच श्रद्धाने कोलांटउडीही घेतली.

पोलिस सूत्रांनी सांगितले की, रियालिटी शो फेम श्रद्धाने सांगितले की, वडील आणि पतीने तिचा बळजबरीने गर्भपात करवून घेतला होता. विशेष म्हणजे संगीत कार्यक्रमातून तिने कमावलेले रुपये या दोघांनी हडपले असल्याचा आरोपही केला होता. पोलिसांनी श्रद्धाच्या घरी जाऊन चौकशीही केली होती. परंतु श्रद्धाने यूटर्न घेतला. त्यामुळे पोलिसांना कोणतीही कारवाई करता आली नाही.

सारेगामापा या रियालिटी शोच्या माध्यमातून श्रद्धाला प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर मृत्युंजय सिन्हा याच्या तिने प्रेमविवाह केला होता. पतीसोबत वाद झाल्यामुळे ती वडिलांकडे राहायला आली होती.