आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरियाणात लुप्त सरस्वती नदी पुन्हा वाहती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यमुनानगर - आता देशातील लोकांना कधीकाळी लुप्त झालेल्या प्राचीन सरस्वती नदीचे शीतल व पवित्र जल पुन्हा दृष्टीस पडू शकेल. हरियाणात मुगलवाली गावात खाेदकाम सुरू असताना पात्रात अनेक िठकाणी सरस्वती नदीचे पाणी पुन्हा प्रवाहित झाले. नदीचे दर्शन घेण्यासाठी आजूबाजूच्या लोकांच्या रांगा लागत आहेत.

लुप्त झालेली पुराणातील सरस्वती नदी पुन्हा प्रवाही करण्यासाठी घाड क्षेत्रात मुगलवाली, छल्लौर, रोलाहाडी आदी गावांत खोदकाम करण्यात येत आहे. मुस्लिम दांपत्य सलमा व रफीक यांनी कुदळ मारून नदीचे खोदकाम सुरू केले. त्यांनी सात - आठ फूट खोदताच नदीचे पाणी उसळून वर आले व वाहू लागले. थंडगार, गोड पाणी पाहताच उपस्थित नागरिक हरखून गेले. खोदकाम सुरू असताना त्याची पाहणी करण्यासाठी यमुनानगरचे जिल्हाधिकारी एस. एस. फुलिया, उपविभागीय अधिकारी जगाधरी प्रेमचंद, बिलासपूरच्या एसडीएम पूजा चावरिया आदी उपस्थित होते. पात्रात पाणी येत असल्याची सूचना प्रशासनाला देण्यात आली. चमचमती वाळू, निळा खडक व त्यातून मिश्र खनिजासारखा रंग असलेले पाणी वाहत होते. सचिव बलकार सिंह यांनी सांगितले की, नदी पात्रात दहा फुटांपर्यंत खोलीकरण केले जात आहे. मजुरांचे खोदकाम सात फुटांपर्यंत पोहोचताच जमिनीत ओल दिसू लागली. खोदकाम आणखी खाली गेल्यावर ओल वाढत जाऊन आठ - दहा फुटांवर गोड व थंड पाणी िदसू लागले. मोठ्या खड्ड्यात पाणी जमा होत होते.

३ किलोमीटरपर्यंत खोदकाम झाले
गेल्या १५ िदवसांपासून सरस्वती नदी पात्रात खोदकाम केले जात आहे. २१ एप्रिल रोजी प्रशासनाने रोलाहेडी गावात नदीचे खोदकाम हाती घेण्यात आले होते. दोन िदवसांपासून खोदकाम करण्यात येत असलेल्या िठकाणी पाण्याचे थेंब जमा होत होते. प्रशासनाची आशा वाढली होती. मुगलवाली गावचे माजी सरपंच हृदयराम व सरपंच सोमनाथ यांनी सांगितले की, प्राचीन काळापासनूच या भागात खोदकामात पाणी आढळून येते.

हे पाणी सरस्वती नदीचेच असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

आठ ठिकाणी खोदकाम, निघाले पाणी
डीडीपीओ गगनदीप सिंह यांनी सांगितले की, आठ िठकाणी पात्रात खोदकाम केले. तीव्र उन्हाळ्यातही तेथे आठ ठिकाणी पाणी आढळून आले. प्रत्येक िठकाणी सरस्वती नदीच आहे. सरस्वती शोध संस्थेचे अध्यक्ष ८८ वर्षीय अध्यक्ष दर्शनलाल जैन यांनी सांगितले की, मी गेल्या १५ वर्षांपासून यावर काम करत आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी या कामासाठी ५० कोटी रुपये मंजूर केल्यामुळे या कामाला वेग आला आहे.