आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालखनौ- जगभरातील अनेक प्रदेशात वादग्रस्त आणि खळबळजनक छायाचित्रे अपलोड करुन विविध जाती-धर्मांना लक्ष्य केले जात आहे. तिकडे, पॅरिसमध्ये महिला अमिनाच्या समर्थनात आणि इस्लामच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. तर इकडे यूपीतील मेरठमध्ये अज्ञाताने फेसबुकवर हिंदू देवी-देवतांची अश्लील फोटो अपलोड करुन तणाव निर्माण केला आहे. सध्या मेरठमध्ये जबरदस्त तणाव आहे.
पंजाबमधील फिरोजपूर आणि बठिंडा जिल्ह्यातही फेसबुकवर डेरा प्रमुख संत गुरमीत राम रहीम यांचीही आक्षेपार्ह फोटो अपलोड केल्यामुळे वाद सुरु झाला आहे. या प्रकरणात फिरोजपूरमधील एका सरकारी शाळेतील शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. दोन दिवसापूर्वी राजस्थानमधील मकराना येथील एका युवकाने सोशल साईटवर धार्मिक टिप्पणी केल्यामुळे असाच वाद उदभवला होता. त्यामुळे चिडलेल्या जमावाने खूप मोडतोड केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.