आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शशिकलाची शेजारी मल्लिकाला हलवले, मैत्री करण्याची अधिकाऱ्यांना होती भीती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू  -अण्णा द्रमुकच्या प्रमुख शशिकला यांच्या जीविताला धोका असल्याच्या संशयावरून त्यांच्या शेजारील कोठडीत असलेल्या सिरियल किलरला दुसऱ्या तुरुंगात हलवण्यात आले आहे.  ५२ वर्षांच्या केडी केपम्मा ऊर्फ सायनाइड मल्लिकाला बंगळुरू सेंट्रल तुरुंगातून उत्तर कर्नाटकाच्या हिंडालगा तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
 
मल्लिकावर सहा महिलांच्या हत्येचा आरोप होता. श्रीमंत महिलांशी मैत्री करून सायनाइडचे विष देऊन त्यांची हत्या करण्याची तिची पद्धत होती. त्यानंतर ती त्यांचे दागिने घेऊन पोबारा करत असे.
 
शशिकलासोबत मल्लिकाचे वागणे अतिशय मैत्रीपूर्ण होते. ती शशिकलास जेवणाच्या रांगेत उभी राहू देत नव्हती. ती स्वत: शशिकलास भोजन नेऊन देई.
 
 मल्लिकाच्या या वागणुकीमुळे अधिकाऱ्यांना संशय आला. त्यामुळे तिला तातडीने दुसरीकडे हलवण्यात आले. शशिकलाने स्वत:ला तामिळनाडूत हलवण्याची विनंतीदेखील केली होती. आता त्यांच्यासोबत कोठडीत हत्येमधील दोषी शुभा शंकर नारायणनदेखील आहे. शुभाने बॉयफ्रेंडच्या मदतीने मध्ये एका अभियंत्याची हत्या केली होती. त्याच्यासोबत तिचा विवाह ठरला होता.  
 
बातम्या आणखी आहेत...