आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Satya Nadella Visit's Microsoft's Campus In Hyderabad During His India Visit

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सत्या नडेलांनी साधला हैदराबादमधील मायक्रोसॉफ्टच्या कर्मचा-यांशी संवाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी कंपनीच्या हैदराबादमधील कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी कर्मचा-यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शनही केले.

नडेला यांनी सकाळी इंडिया डेव्हलपमेंट सेंटर (IDC) मधील कार्यालयाला भेट दिली. अमेरिकेतील रेडमाँडमधील कंपनीच्या मुख्यालयानंतर सर्वात मोठा परिसर हैदराबादमधील या कँपसचा आहे. यावेळी नडेला यांनी कर्मचा-यांना कंपनीच्या व्हिजनबाबत मार्गदर्शन केले.

या भेटीबाबात अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. नडेला यांनी सीईओ पद स्वीकारल्यानंतर त्यांचा हैदराबादचा पहिलाच दौरा आहे. मूळचे हैदराबादचे असणारे नडेला यांनी काल तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेतली असल्याचीही चर्चा आहे. मात्र त्याबाबातही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशी त्यांनी काल फोनवरून चर्चा केल्याचे आंध्र प्रदेश सरकारमधील सुत्रांनी सांगितले. आंध्रप्रदेश आणि तेलंगणा दोन्ही राज्ये आयटीचा अधिकाधिक प्रसार व्हावा यासाठी नडेलांची मदत घेण्यासाठी उत्सुक आहेत.

निवृत्त आयएएस अधिकारी बी.एन. युगंधर यांचे पुत्र असलेले नडेला हे हैदराबाद पब्लिक स्कूलचे माजी विद्यार्थी आहेत. दिल्लीत होणा-या नासकॉमच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नडेला हे भारतात आले आहेत.