आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता डोक्यावर मैला वाहणार नाही; महिलांचा आवाज घुमला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’या कार्यक्रमाचा तिसरा सीजन २१ सप्टेंबर रोजी सुरू होत आहे. या शोमध्ये मांडण्यात आलेल्या मुद्द्यांवर सामाजिक परिवर्तन घडवण्यात मिळालेले योगदान असे-

उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्हा. परगामा गावातील दलित महिला रखरखत्या उन्हात घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरल्या . आता डोक्यावर मैला वाहून नेणार नाही, असा त्यांचा नारा आहे. या कुप्रथेविरोधात आंदोलन करणार्‍यांमध्ये महिलाच केंद्रस्थानी आहेत. ‘सत्यमेव जयते’च्या २०१२ मध्ये प्रसारित झालेल्या पहिल्या सीझनमध्ये हाच मुद्दा मांडण्यात आला होता.

या कुप्रथेविरोधात काम करणार्‍या जनसाहस या एनजीओचे संस्थापक आसिफ शेख सांगतात, ‘मैला वाहणारे पुरुष कमी असतात. महिलांनी मैला नेण्यास नकार दिल्यास पुरुषांवर दबाव टाकला जातो. याच उद्देशाने दलित महिलांना सोबत घेऊन आम्ही २०१२ च्या अखेरीस मैला मुक्ती यात्रेस सुरुवात केली होती. देशभरात १८ जिल्ह्यांतील २०० गावांतून ही यात्रा फिरली. त्यानंतर देशभरातील अडीच हजार महिलांनी आता कधीही डोक्यावर मैला वाहून नेणार नाही, असा पण केला.’ सफाई कर्मचारी आंदोलनाचे बेजवादा विल्सन म्हणतात, ‘दलितांच्या पाठीशी आता अनेकजण उभे राहत आहेत. या कुप्रथेविरोधात संसदेतही विधेयक पारित झाले आहे.’

पोलिसांचेही संरक्षण
अन्य एक कार्यकर्ता अकबर सांगतात, ऑक्टोबर २०१२ मध्ये परगामा गावात दलित महिलांनी रॅली काढली होती. त्यात खूप मोठे परिवर्तन दिसून आले.

उच्चवर्णीय लोकांनीही ही कुप्रथा संपुष्टात आणण्याची गरज जाणली. दलितांना पोलिस संरक्षणही मिळाले. पूर्वी उच्चवर्णीयांच्या दबावामुळे पोलिस दलितांच्या तक्रारीही नोंदवत नसत.
(उत्तर प्रदेशातील आंदोलनात मैला वाहण्याचे टोपले जाळताना दलित महिला)