आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kailash Satyarthi\'s Work Was Anything But Nobel Worthy By Megha Bahree

फोर्ब्सच्या माजी पत्रकाराचा आरोप, खोटे आकडे दाखवून निधी जमवते सत्यार्थी यांची संस्था

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतात शांततेचे नोबेल आल्याने सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. पण सत्यार्थी यांच्या संस्थेवर आरोपही सुरू झाले आहेत. फोर्ब्सच्या माजी पत्रकार मेघा बहरी यांनी या पुरस्कारासाठी सत्यार्थी आणि त्यांची एनजीओ योग्य नसल्याचे म्हटले आहे. ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी हे आरोप केले आहेत. सत्यार्थी यांच्यावर थेट आरोप न करता त्यांच्या एनजीओवर निधी उकळल्याचा आरोप केला आहे.

मेघा यांनी ट्वीटरवर आपले अनुभव मांडले आहेत, मेघा 2008 मध्ये फोर्ब्ससाठी बालमजुरीवर एक रिपोर्ट तयार करत होत्या. त्यावेळी भारतात अनेक ठिकाणी त्यांचे फिरणे झाले. त्या आंध्रप्रदेशच्या मॉनसेंटो कॉटन फील्डपासून राजस्थानच्या ग्रेनाइट क्वेरीज, दिल्लीच्या झोपडपट्टी आणि उत्तर प्रदेशच्या कार्पेट बेल्टमध्येही गेल्या. याठिकाणी अनेक बालमजूर अत्यंत बिकट परिस्थितीत अमेरिका आणि जगातील इतर मोठ्या देशांसाठी काम करतात. त्यासाठी त्यांना मोबदलाही अत्यंत कमी दिला जातो.

सत्यार्थी आणि त्यांची संस्था उद्देश पूर्ण करू शकली नाही याचा पहिल्याच भेटीत अनुभव आल्याचे त्या म्हणाल्या. त्या सत्यार्थी यांच्या संस्थेच्या मोठ्या अधिका-यांना भेटल्या. त्यांनी उत्तर प्रदेशातील कॉर्पेट बनवणा-या मजुरांनाही भेटायला हवे असे सांगितले. आम्ही गेलो तेव्हा आम्हाला तेथे फक्त मोठी माणसे काम करताना दिसली. एक दोनच लहान मुले होती. मी जेव्हा त्यांना कामाबाबत विचारले तेव्हा मात्र त्यांना काहीही सांगता आले नाही. त्यांनी शाळेचा गणवेशही घातलेला होता.
संस्था जेवढे अधिक बालमजुर दाखवते तेवढा अधिक निधी संस्थेला मिळत असतो. त्यामुळे संस्था जास्त निधी मिळवण्यासाठी खोटे आकडे सादर करते असे यावरून स्पष्ट होत असल्याचे मेघा म्हणाल्या. भारतात बारमजुरीचे प्रमाण खूप जास्त आहे यात काहीही शंका नाही. सत्यार्थी यांच्या संस्थेनेही अनेक कामे केली असतील. पण ज्या प्रमाणे हिरो बनवण्यात येत आहे, प्रत्यक्षात तशी परिस्थिती नसल्याचे मेघा म्हणाल्या.
पुढे पाहा, मेघा यांनी केलेले ट्वीट