आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रद्युम्न मर्डर: कोर्ट म्हणाले, हे प्रकरण संपूर्ण देशाचे; केंद्र-हरियाणाला सरकारला नोटीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेयान इंटरनॅशनल स्कूलच्या टॉयलेटमध्ये मुलाची डेडबॉडी सापडली होती. - Divya Marathi
रेयान इंटरनॅशनल स्कूलच्या टॉयलेटमध्ये मुलाची डेडबॉडी सापडली होती.
नवी दिल्ली- गुरगावमधील रेयान स्कूलमध्ये हत्या करण्यात अालेल्या वर्षीय प्रद्युम्न या मुलाच्या वडिलांकडून सीबीआय चौकशीची मागणी करत दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी झाली. कोर्टाने केंद्र, हरियाणा सरकार सीबीएसईला नोटीस पाठवून तीन आठवड्यांत उत्तर मागवले आहे. कोर्ट म्हणाले, हे प्रकरण केवळ एका शाळेपुरते नाही. ते तर अवघ्या देशाशी निगडित आहे. 

दरम्यान, रेयान समूहाच्या दोन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे, मुंबईतील रेयानच्या मुख्यालयात जाऊन पोलिस चौकशी करणार अाहेत. 
 
काय आहे प्रकरण 
- गुडगाव येथील रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुक्रवारी (8 सप्टेंबर) 7 वर्षांच्या मुलाची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. मृत मुलाचे नाव प्रद्युम्न असून त्याचा मृतदेह शाळेच्या टॉयलेटमध्ये सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी त्याच दिवशी संध्याकाळी स्कूल बस कंडक्टर अशोक कुमारला अटक केली होती. आरोपी 8 महिन्यांपूर्वीच शाळेत कामाला लागला होता. त्याने माध्यमांसोबत बोलताना सांगितले, की माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. मी मुलांच्या टॉयलेटमध्ये चुकीचे काम करत होतो. तेव्हाच तो मुलगा तिथे आला. त्याने मला पाहिले. मी त्याला धक्का दिला आणि परत आत ओढले. तो ओरडायला लागला म्हणून मी घाबरलो. मग मी चाकूने दोनदा त्याच्या गळ्यावर वार केले. 
 
पित्याने सुप्रीम कोर्टात केले होते अपील 
- मृत प्रद्युम्नचे वडील वरुण यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन मागणी केली आहे की हत्येचा सीबीआय तपास व्हावा आणि शाळेत मुलांच्या सुरक्षेसाठी नियमावली तयार करण्यात यावी. 
- वरुण यांचे वकील सुशील टेकरीवाल म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीत सीबीआयने या प्रकरणाचा तपास करावा, त्यामुळेय निष्पक्ष तपास होईल. 
 
सुप्रीम कोर्ट म्हणाले हे संपूर्ण देशाचे प्रकरण 
- सोमवारी या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सर न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वातील पीठाने केंद्र, हरियाणा सरकार आणि सीबीएसईला नोटीस बजावली. 
- कोर्टाने सीबीएसईला शाळेमधील मुलांची सुरक्षा आणि अशा प्रकरणात शाळा प्रशासनाचे उत्तरदायित्व यावर मार्गदर्शक तत्त्वे तीन आठवड्यात तयार करण्यास सांगितले आहे. 
- मिश्रा यांच्या नेतृत्वातील जस्टीस ए.एम. खानविलकर आणि जस्टीस डी.वाय. चंद्रचूड यांच्या पीठाने म्हटले की, ही याचिका फक्त एका शाळेपर्यंत मर्यादीत नाही तर हे संपूर्ण देशाचे प्रकरण आहे. 
 
असे उघड झाले प्रकरण 
- डेव्हिडच्या नावाने चीनवरुन एक पार्सल आले होते. विमानतळावरच तपास अधिकाऱ्यांनी ते पार्सल जप्त केले होते. त्यामध्ये 3 फूट 10 इंचाची चाइल्ड सेक्स डॉल होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी डेव्हिडच्या घरी छापा टाकला त्यात अनेक धक्कादाक बाबी आढळल्या होत्या. 
- अधिकाऱ्यांनी चाइल्ड सेक्स डॉलसोबतच त्याच्या घरातून 34 हजार अश्लिल आणि अभद्र फोटो जप्त केले. हे सर्व फोटो त्याने प्रायमरी शाळेत प्रशासक असतानाच्या काळात काढले होते. शाळेतीलच मुलांचे लपून-छपून तो फोटो घेत होता. त्याच्या कॉम्प्यूटरमध्येही अनेक आक्षेपार्ह्य बाबी सापडल्या. 
- डेव्हिडने चाइल्ड सेक्स डॉलसाठी अंडरगारमेंड खरेदी केल्याचे आणि या डॉलसोबत सेक्स केल्याचे कोर्टात कबूल केले.
- या प्रकरणावरुन दिसून येते की पश्चिमी देशांमध्ये लहान मुलांच्या सुरक्षेची आणि त्यांच्या सन्मानाची किती काळजी घेतली जाते. त्याबाबत तेथील यंत्रणा आणि न्याय व्यवस्था किती संवेदनशील आहे, की डॉल सोबतचे अश्लिल कृत्यही गुन्हेगारी स्वरुपाचे मानले जाते. 
बातम्या आणखी आहेत...