आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानमध्ये स्कूल बस ट्रकवर आदळली; 10 विद्यार्थ्यांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगंगानगर/हनुमानगड- राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यातील गोलूवालाजवळ आज (मंगळवार) सकाळी सात वाजता स्कूल बस एक ट्रकवर आदळली. या अपघातात 10 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला तर 20 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. बसचालकाचा बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते. सरस्वती बाल विद्या मंदिर सीनिअर सेकंडरी स्कूलचीही बस होती. त्यात जवळपास 45 विद्यार्थी होते.


पोलिस सूत्रांनुसार, मंगळवारी सकाळी सात वाजता अमरसिंहवाला गावाजवळे ओव्हरटेक करताना सरस्वती बाल विद्या मंदिर स्कूलची बस एका ट्रकवर आदळली. दुर्घटना इतकी भयानक आहे, की 10 विद्यार्थ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमी विद्यार्थ्यांना गंगानगर आणि हनुमानगड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बहुतेक जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर संतप्त जमावाने रोड जाम केला आहे. घटनास्थळावर पोलिस दाखल झाले आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा अपघाताची छायाचित्रे...