आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • School Bus And Railway Accident, News In Marathi, Hyedarabad

स्कूलबस चेंडूसारखी उडाली, 15 विद्यार्थ्यांसह 20 ठार, संतप्त लोकांची दगडफेक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड/हैदराबाद- नांदेड-हैदराबाद पॅसेंजरला पाहताच रेल्वेचालकाने करकचून ब्रेक दाबले; परंतु स्कूल बस एवढी वेगात होती की धडकल्यानंतर ती चेंडूसारखी हवेत उंच उडाली, अशी माहिती या गाडीतून प्रवास करणार्‍या नांदेडच्या प्रवाशांनी दिली. अपघातानंतर संतप्त लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

नांदेड शहरातील ज्येष्ठ पत्रकार कमलाकर जोशी याच गाडीने प्रवास करत होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामारेड्डी-हैदराबाददरम्यान असलेल्या मसाईपेठ रेल्वे क्रॉसिंगवर ही घटना सकाळी 9.20 वाजता घडली. अपघातस्थळाच्या बाजूलाच निझामाबाद-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग आहे. या रस्त्याला समांतर असाच रेल्वे ट्रॅक आहे. या क्रॉसिंगवर गेट नाही. गेटमन तर दूरच. मसाईपेठ व आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस समोर आल्यानंतर रेल्वेच्या इंजिनचालकाने करकचून ब्रेक दाबले, परंतु तरीही स्कूल बस चेंडूसारखी उंच उडाली. जवळपास 15 पेक्षा जास्त मुलांचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघातानंतर आजूबाजूच्या गावांतील हजाराहून अधिक लोकांचा जमाव रेल्वेच्या दिशेने आला. या संतप्त लोकांनी रेल्वेतील प्रवाशांना खाली उतरायला सांगितले. त्यानंतर रेल्वेवर दगडफेक केली. प्रवासी बाजूलाच असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर आले व तिथून मिळेल त्या वाहनाने हैदराबादकडे रवाना झाले. रेल्वेचालकाला मारण्यासाठी लोक धावले, परंतु तो अपघातानंतर लपून बसला. तो हाती लागला नाही. जवळपास 500 तरुणांनी पोकलेनच्या साहाय्याने इंजिन रुळावरून फेकण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला.

आधी पोहोचली रुग्णवाहिका :अपघातानंतर अर्ध्या तासातच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर बर्‍याच वेळाने पोलिसही आले.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, ऑन द स्पॉट: रेल्वेचालक लपून बसला