आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेजवळ दारूचे दुकान उघडल्याने मुलांकडून अनोखा निषेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदनोर/भिलवाडा- जिल्ह्यातील भादसी गावात शाळेजवळ एक दारूचे दुकान उघडले. दारुड्यांच्या वाढत्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यांनी बदनोरच्या तहसील कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केले. गुरुकुल विद्यानिकेतन प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी तहसीलदारांसमोर कोंबडा बनून उभे राहिले. त्यांनी दारूचे दुकान त्वरित हटवण्यात यावे अशी विनंती केली. 

तहसीलदारांशी बोलताना त्यांनी सांगितले...
अवघ्या २० मीटर अंतरावर दारूचे दुकान आहे. आम्हाला दारुड्यांचा त्रास होतो. शाळेतील शिक्षक खिमेंद्रसिंह रावत यांनी सांगितले : या आधीही आम्ही जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिले आहे. अबकारी विभागासही  निवेदन दिले. मात्र, यावर निर्णय झालेला नाही. दुकान न हटवल्याने विद्यार्थी तहसीलदारांना भेटण्यास आले. 
 
विद्यार्थ्यांनी सांगितले...
लाेक शाळेच्या बाहेर उभे राहून दारू पितात आणि शिवीगाळ करतात. शाळेच्या जवळ दारूचे दुकान असल्याने लोक दारू पिण्यासाठी शाळेजवळ येतात. दारू पिऊन भांडणे, मारामाऱ्या करतात. यामुळे आमच्या शिक्षणावर परिणाम होतो आहे. विद्यामंदिराजवळील असे अवैध धंदे बंद व्हावेत.

तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही  दारूचे दुकान हटत नसल्याने गुरुकुल विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालय गाठले. तहसीलदारांसमोर स्वत:ला शिक्षा म्हणून कोंबडा बनून उभे राहिले. तहसीलदारांनी यावर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
बातम्या आणखी आहेत...