आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेन्नई : आजही बंद राहणार शाळा आणि कॉलेजेस, आयटी कर्मचाऱ्यांना सुटी देण्याचा सल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - गुरुवारी सायंकाळी जवळपास सलग 6 जास झालेल्या पावसामुळे चेन्नईसह तमिळनाडूतील किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे आज शुक्रवारीही शाळा आणि कॉलेजेस बंद राहणार आहेत. आयटी कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांना सुटी द्यावी असा सल्ला देण्यात आला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी जमा झाल्याने गुरुवारी सायंकाळनंतर वाहतुकीची कोंडीही झाल्याचे पाहायला मिळाले. किनारी भागात सुमारे 115 ठिकाणी निवाऱ्यांची व्यवस्था केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
 
बससेवाही ठप्प..
> हवामान विभागाने शुक्रवारीही किनारी भागांत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. 
> राज्यात इतर ठिकाणीही पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. 
> गुरुवारी चेन्नईसह तमिळनाडूतील अनेक भागांत पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. 
> राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने गुरुवारी सायंकाळी दिशानिर्देश जारी करण्यात आले.  
> गुरुवारी सायंकाळी सततचा पाऊस आणि साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक अनेक ठिकाणी विस्कळीत झाली. 
> अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्याची पातळी जास्त असल्याने रिक्षा रस्त्यातच बंद पडलेल्या अवस्थेत आढळल्या. 
> चेन्नईतील विमानसेवेवर मात्र या पावसाचा काहीही परिणाम झाला नसल्याचे सांगण्यात आले. 
> बससेवा मात्र पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. 
> मरीना बीच परिसरात लोक गुडघाभर पाण्यातून गाड्या ढकलत नेत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...