आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 ची मुलगी, 18 चा मुलगा, नऊ महिन्यांच्या मुलीचे आई-वडील; शाळेत जडले होते प्रेम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - दोन दिवसांपूर्वीच तो 18 वर्षांचा झाला आहे. तर त्याच्या बरोबर राहणा-या मुलीचे वय केवळ 16 वर्षे दोन महिने आहे. या वयात या दोघांना नऊ महिन्यांची एका मुलगी आहे. ही एखादी कथा नाही तर सत्य घटना आहे. सध्याच्या सामाजिक परिस्थितीचे दर्शन घडवणारा हा प्रकार आहे. तथाकथित आधुनिक समाजामध्ये ती नाती तयार होत आहेत, त्यावर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. हे दोघेही शहरातील दोन प्रतिष्ठीत कॉनव्हेंट स्कूलमधील आहेत. मुलगी 8वी मध्ये तर मुलगा 10वी मध्ये आहे. त्यांच्यात मैत्री झाली, त्याचे रुपांतर प्रेमात झाले आणि या दोघांनी एकमेकांबरोबर शारीरिक संबंधही प्रेम प्रस्थापित केले.
या सर्वानंतर हे दोघे घरातून पळून गेले आणि सेक्टर-26 मध्ये वेगळे राहू लागले. मुलाच्या कुटुंबानी नाते ठेवले पण मुलीच्या कुटुंबीयांनी पूर्णपणे नाते तोडले. 9 महिन्यांपूर्वी 16 वर्षांच्या यामुलीने एका कन्येला जन्म दिला. पण मंगळवारी अचानक मुलीने मुलाबरोबर राहण्यास नकार दिला. तिच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी यूटी चाइल्ड प्रोटेक्शन सोसाइटीला फोन केला. तेथून आलेली टीम मुलीला घेऊन सेक्टर-26 च्या पोलिस ठाण्यात पोहोचली. त्यानंतर मुलगी व तिची मुलगी सध्या मदर तेरेसा होम येथे राहत आहेत.

मुख्याध्यापकांनी सोसाटीकडे मागितली मदत
दोघेही कॉनव्हेंटमध्ये शिकत होते. मुलीने मुलीला जन्म दिला आणि तो मुलगा बाप बनला. दोघांच्या शाळेतही ही बातमी समजली. त्यानंतर दोघांचे नाव शाळेतून काढून टाकण्यात आले. त्यानंतर याच वर्षी मुलीला 18 मॉडल स्कूलमध्ये प्रवेश मिळाला. मुलाने एका वर्षाच्या गॅपनंतर 10 वीची परीक्षा दिली आहे. हा प्रकार 18 मॉडल स्कूलच्या मुख्याध्यापकांना समजला तेव्हा त्यांनी सोसायटीला ही माहिती दिली. कॉनव्हेंटमधून मॉडेल स्कूलमध्ये प्रवेश घेतल्याने मुलीला शिकवलेले काहीही समजत नव्हते. त्यानंतर त्या मुलीनेच मुख्यध्यापकांना सर्व काही खरे सांगितले.

पुढील स्लाईडवर वाचा, पोलिसांनी चर्चा केल्यानंतर मुलाचे कुटुंबीय झाले राजी