आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डान्सर सपना चौधरीच्या गाण्यावर स्कूलगर्लचा डान्स, व्हिडिओ झाला VIRAL

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक- हरियाणातील प्रसिद्ध डान्सर आणि रागिनी शैलीतील सिंगर सपना चौधरीने गेल्या आठवड्यात आत्महत्येचा प्रयत्न केला. आता सपनाची प्रकृती स्थिर आहे. सपना हरियाणाच नाही तर पंजाब, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेशातही फेमस आहे. 20 वर्षांच्या सपनाचे अवघ्या 12 व्या वर्षी पितृछत्र हरपले होते. मोठ्या संघर्षातून तिने गाणे आणि डान्सिंगमध्ये आपली कारकिर्द घडवली.
हरियाणासह एनसीआर आणि यूपीतील लोकल एरिया सपना चौधरीची प्रचंड क्रेझ आहे. तिच्या नावाने अनेक फेसबुक पेज आहेत. त्यावर तिचे डान्सचे अनेक व्हिडिओ आणि फोटोज आहेत. इतकेच नाही तर, तिचे गीत आणि डान्सच्या अनेक मूव्हज फॅन्स फॉलो करतात.

सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ अलिकडे व्हायरल झाला आहे. त्यात एक स्कूल गर्ल सपनाच्या स्टेप्सवर थिरकताना दिसत आहे.

जाणून घ्या काय आहे व्हिडिओमध्ये...
- हरियाणातील एका स्कूलचा हा व्हिडिओ आहे. सरस्वती पूजनादरम्यान एका विदयार्थिनीने डान्स करताना दिसत आहे.
- सपनाच्या 'न ओल्हा न धाटा' या गीताच्या अनेक स्टेप्स ही विद्यार्थिनी फॉलो करतेेय.
- व्हिडिओ अनेक लोकांनी आपापल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे.
- विद्यार्थिनी एका क्लासरुममध्ये डान्स करत आहे. तिच्या मागे ब्लॅॅकबोर्ड दिसत आहे.
- ब्लॅॅकबोर्डच्या खाली साउंड सिस्टिम दिसत आहे. तसेेच इतर विद्यार्थी आणि शिक्षक विद्यार्थिनीचा डान्स पाहात आहेत.
- विद्यार्थिनीचा डान्स आतापर्यंत पाच लाखांंहून जास्त लोकांंनी पाहिला आहे. तसेेच बहुसंंख्य लोकांंनी लाइक आणि शेअर देखील केला आहे.
या पोस्‍टमुळे सपना झाली खूप व्‍यथित?
सपनाने सुसाइड नोटमध्‍ये लिहिले, ''आज सकाळी मी फेसबूकवर एक पेज पाहिले. यावर लिहिले होते, सपना चौधरीची धमकी- नेते आणि अधिकाऱ्यांना करेल भोंगळे. ' यात मला धरून खूप काही आक्षेपार्ह लिहिलेले होते. त्‍यामुळे मी खचून गेली.
- त्‍यातील मजकूर वाचून मी आतल्‍या आत मरून गेली. माझ्यावर उडवलेले शिंतोडे पाहून जगण्‍याची इच्‍छा संपली. या पेजवर लिहिले होते, मोठे अधिकारी माझ्या शरिराशी खेळतात. स्टेजवर मी श्रोत्‍यांना खूश करते तर रात्री मंत्री आणि अधिकाऱ्यांना. पण, मी असे काहीही केलेले नाही.
- सतपाल तंवरनेच मला बदनाम करण्‍यासाठी हा कट रचला आहे, असा आरोपही तिने केला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सपनाच्या डान्स स्टेप्स फॉलो करणार्‍या स्कूल गर्लचा व्हिडिओ आणि फोटोज...

(Pls Note-
तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तरURLम्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...