आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळकरी मुलीची सामुहिक बलात्‍कार करुन हत्‍या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नादिया- पश्चिम बंगालच्‍या नादिया जिल्ह्यात एका चौदा वर्षीय मुलीची सामुहिक बलात्‍कारानंतर हत्‍या करण्‍यात आल्‍याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी शाळेतून घरी परतत असताना हा प्रकार घडला.

पोलिसांच्या माहितीनुसार, ही मुलगी इयत्ता सातवीमध्‍ये शिकते. शाळेतून घरी जाताना मुसळधार पाऊस जास्त पडत असल्यामुळे तिने रेल्वेच्या शेडजवळ आश्रय घेतला. त्‍याचवेळी तिच्या घराशेजारी राहणारा बिमल सरदार तिथे आला. त्‍याने तिला त्याच्याजवळ असलेल्या छत्रीतून घरी जाऊ असे सांगितले. शेजारीच असल्‍यामुळे तिने त्‍याला नकार दिला नाही. परंतु, त्‍यानेच घात केला.

सरदार याच्यासोबत आणखी दोघे जण होते. काही अंतरानंतर या सर्वांनी मिळून त्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर गळा दाबून तिची हत्‍या केली. आज सकाळी मुलीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. स्थानिक लोकांनी मुलीला सरदारसोबत जाताना पाहिले होते. त्‍यामुळे त्‍यांनी सरदार याला बेदम मारहाण करुन पोलिसांच्‍या ताब्‍यात दिले. पोलिसांनी बिमल सरदारसोबत त्‍याच्‍या दोन सहका-यांनाही अटक केली आहे.