आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्तीसगडचे दंतेवाडा; सभोवती नक्षली, मध्यभागी शाळा, जागांपेक्षा मुले जास्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नक्षली हल्ल्यांसाठी कुख्यात अशी ओळख असलेले छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील जवांगा. मात्र, आता येथे अशी परिस्थिती नाही. सरकारने येथे ३ वर्षांपूर्वी आस्था विद्यापीठाची स्थापना केली. आता ते एज्युकेशन सिटी म्हणून प्रसिद्ध झाले आहे. कांकेर, बस्तर, नारायणपूर आणि कोंडागावमधील लोक मुलांच्या शिक्षणासाठी रायपूर-भिलाईएेवजी दंतेवाडात येत आहेत.
- यंदा नर्सरीच्या ४० जागांसाठी ६१७ अर्ज.
- सध्या शाळा ७ वी पर्यंतच. पुढे कॉलेज स्तराच्या संस्थेचा प्रस्ताव.
- दंतेवाडापासून १४ किमीवर एज्युकेशन सिटी.

अनाथांना साथ
शाळेत एकूण ८२२ मुले आहेत. नक्षली भागामुळे अनाथ मुलांना प्राधान्य दिले आहे. सध्या अशी २५ मुले शाळेत आहेत.

नि:शुल्क शिक्षण
राहणे, खाणे, वह्या-पुस्तके आदी सर्व खर्च सरकारकडे. सीबीएसई इंग्लिश अभ्यासक्रम. ७ वी पर्यंत शिक्षण. स्मार्ट क्लास, सायन्स लॅब व लायब्ररीसह सर्व उच्च दर्जाच्या सुविधा.