आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाव विचारून केले KISS, मुलगी म्हणाली- प्रिन्सिपलला तुरुंगात सडताना पाहायचेय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडित विद्यार्थिनीने आरोप केला की, प्रिन्सिपलने ऑफिसमध्ये बोलावून किस केले. - Divya Marathi
पीडित विद्यार्थिनीने आरोप केला की, प्रिन्सिपलने ऑफिसमध्ये बोलावून किस केले.
देवरिया - येथे 7वीच्या विद्यार्थिनीने मंगळवारी प्रिन्सिपलवर शाळेत अश्लील चाळे केल्याचा आरोप केला आहे. पीडिता म्हणाली, त्याने ऑफिसमध्ये बोलावले, अगोदर वडिलांचे आणि माझे नाव विचारले आणि पकडून किस करू लागला. याआधीही अनेक मुलींसोबत त्याने असे केले आहे. मला तो तुरुंगात सडताना पाहायचेय.
 
जिवे मारण्याची दिली होती धमकी...
- ही घटना रामपूर कारखाना परिसरातील हरिनारायण शिक्षण संस्थेतील आहे. येथे पीडित विद्यार्थिनी सविता (बदललेले नाव) 7वीच्या वर्गात शिकतेय.
- विद्यार्थिनीचे म्हणणे आहे की, प्रिन्सिपल रमेश यादवने छतावर बोलावले, परंतु मी गेले नाही. यानंतर त्याने ऑफिसमध्ये बोलावले. अगोदर वडिलांचे नाव विचारले आणि मग मला पकडून किस करू लागला.
- यानंतर मी तिथून जोरात पळून बाहेर गेले. आई आणि बहिणीला घडलेला प्रकार सांगितला. त्याने हे कुणालाच काही सांगू नकोस, नाहीतर जिवे मारीन अशी धमकीही मला दिली होती.
- मला तो जेलमध्ये सडताना पाहायचेय. कारण त्याने याआधीही 5-6 तरुणींसह असे केलेले आहे.
 
काय म्हणतात पोलिस?
- एएसपी सुरेंद्र बहादूर म्हणाले की, प्रिन्सिपलच्या विरोधात अश्लील चाळे केल्याच्या आरोपात तक्रार नोंदवण्यात आली आहे. आरोपी प्रिन्सिपल फरार असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, प्रकरणाशी निगडित अधिक फोटोज...
बातम्या आणखी आहेत...