आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • School Student Death In Bus Accident In Jalandhar

ड्रायव्हरने लावला जोरात ब्रेक, चिमुकल्याचे डोके आले गाडीच्या चाकाखाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ड्रायव्हरने जेव्हा जखमी आरुषला बसमध्ये झोपावले तेव्हा, रक्तपाहून इतर मुले रडायला लागली.)
जालंदर - शाळेला उशीर होत असल्याने स्कूलबस वेगाने चालली होती. बसचा दरवाजा उघडाच होता. चार वर्षाचा आरुष उघड्या दरवाज्याच्या समोरील सिटवर बसलेला. गाडीसमोर स्पीड ब्रेकर आले. ड्रायव्हरने जोरात ब्रेक दाबला आणि आरुष दरवाज्यातून खाली पडला आणि त्याचे डोके गाडीच्या चाकाखाली आले. सर्व मुले घाबरली, जोरात ओरडली. सर्वांच्याच अंगावर काटा आला. ड्रायव्हरने लगेचच आरुषला उचलून बसच्या सीटवर झोपवले. सर्वत्र रक्ताच्या सडा. पटकन बस टागोर दवाखान्यात नेली, मात्र खूप उशीर झाला होता. चिमुकल्या आरुषचे प्राण केव्हाच निघून गेले होते. पोलिसांनी ड्रायव्हर आणि कंडक्टरला अटक केली.
हृदयाला पिळवटून टाकणारी ही घटना चित्रपटातील एखादे दृश्य नव्हे तर सत्य घटना आहे. ही घटना आहे जालंदरच्या पटेल चौका जवळची. पटेल चौकाजवळ असलेल्या गुरूव्दारा रामगढीयाच्या बाहेर दुपारी सव्वा एक वाजता हा अपघात घडला. दवाखान्यात आरुषच्या मृत्यूबद्दल कळताच ड्रायव्हर पळायला लागला. लोकांनी त्याला धरले आणि ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या थोबाडीत दिली. पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी बशीरपूरा येथील रहिवासी ड्रायव्हर जगदीप सिंह आणि भोजोवाल येथील कंडक्टर मनदीप सिंह यांच्यावर गुन्हा दाखल केला.

मुलाचा मृतदेह पाहून वडील पडले बेशुध्द
आरुष इनोसंट हार्ट्स स्कूल मॉडल टाऊनच्या प्रायमरी विंग इनोकिडस्च्या एलकेजीमध्ये शिकत होता. आरुषचे वडिल चंदन अरोडा यांचा पाईप फिटींगचा व्यवसाय आहे. आरुशच्या मृत्यूबद्दल माहिती मिळताच चंदन आणि त्यांची पत्नी टागोर दवाखान्यात पोहोचले. आरूशचा मृतदेह पोलिस जेव्हा घेऊन जायला लागले तेव्हा चंदन जागीच बेशुध्द पडले. त्यांना लगेच उचलून आपातकालीन विभागात दाखल करण्यात आले. दीड तासांनंतर चंदन शुध्दीवर आले.
दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ
पाईप फिटींगचा व्यवसाय करणारे चंदन अरोडा यांचा विवाह 3 सप्टेंबर 1998 ला मंडी रोड येथील कृष्ण नगरमध्ये राहणार्‍या ज्योती अग्रवाल यांच्याशी झाले. त्यांना दोन प्राची आणि आसी नावाच्या दोन मुली आणि एक मुलगा आरुश असे तीन मुले होती. चंदन यांनी आपल्या दोन्ही मुलींच्या नावावर आपला व्यवसाय केला होता, तर आरुषच्या नावावर मंदिर केले होते. आरूषचा जन्म 28 एप्रिल 2010 ला झाला होता.