बंगळुरू - एक दिवस डॉक्टर रक्तवाहिन्यांमध्ये रोबोला नेऊन उपचार करतील, अशी भविष्य विख्यात भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड फेनमॅन यांनी काही दशकांआधी वर्तवले होते. भारतीय शास्त्रज्ञाने हे भाकीत सत्यात उतरवले आहे. बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या शास्त्रज्ञांनी रक्तवाहिन्यांत जाऊ शकेल असे उपकरण विकसित केले आहे. संस्थेचे भौतिकशास्त्रज्ञ अंबरीश घोष म्हणाले, हे सिलिकापासून बनवण्यात आले आहे. त्याचा वरचा पृष्ठभाग चुंबकीय आहे. संस्थेच्या मटेरिअल विषयाचे शास्त्रज्ञ आणि इलेक्ट्रिकल अभियंत्यांची ही संयुक्त निर्मिती आहे. त्याद्वारे शरीरातील अनेक बायोमेडिकल अॅप्लिकेशन पूर्ण केले जाऊ शकतात. याला नॅनो वायजर संबोधले जात आहे.
पुढे वाचा.....