आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुप्रसिद्ध वैज्ञानिक, माजी केंद्रीय मंत्री प्रो.मेनन यांचे निधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
| नवी दिल्ली - सुप्रसिद्ध वैज्ञानिक आणि माजी केंद्रीय मंत्री प्रोफेसर एम.जी. मेनन (८८) यांचे मंगळवारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

पद्मविभूषण मेनन व्ही.पी.सिंह सरकारमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्य मंत्री होते. ते केंद्रीय विज्ञान- तंत्रज्ञान आणि पर्यावरण विभागात सचिवपदी देखील होते. वर्ष १९९०-९६ पर्यंत राज्यसभेत सदस्य होते. १९८६-१९८९ दरम्यान पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. योजना आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. भौतिकशास्त्राचे तज्ज्ञ प्रो. मेनन १९७२ मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख होते. वर्ष १९८९-१९९० पर्यंत विज्ञान व तंत्रज्ञान परिषदेचे उपप्रमुख होते.
बातम्या आणखी आहेत...