आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शास्त्रज्ञांनी बनवली चिप; देईल अंधांना दृष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालंधर - कायमचे अंधत्व आलेल्या व्यक्तीही आता पाहू शकतील, तेही केवळ एका चिपच्या माध्यमातून, अशी चिप शास्त्रज्ञांनी तयार करण्यात यश आले असून ही चिप रेटिनापासून मेंदूपर्यंत दृश्यात्मक सिग्नल पोहोचवण्याचे काम करणार आहे. त्यामुळे दृष्टी गमावलेली व्यक्तीही पाहू शकेल. सध्या या चिपची चाचणी सुरू असून लवकरच ती बाजारात उपलब्ध होणार आहे, अशी माहिती प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. ए. के. कक्कड यांनी दिली. डॉ. कक्कड यांनी सांगितले की, लवकरच ही चिप बाजारात उपलब्ध होणार आहे. इतकेच नव्हे, तर ज्यांची ऑप्टिकल नस डॅमेज झाली असेल त्यांना स्टेम सेल थेरेपीच्या माध्यमातून मेंदू व रेटिनाच्या दरम्यानच्या तुटलेल्या लिंक जोडल्या जाऊ शकतात व दृष्टी पूर्ववत होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सेंटर फॉर साइट व पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेले डाॅ. महिपालसिंग सचदेवा यांनी डोळ्यांच्या उपचारात स्माइल थेरपीचा वापर होत असल्याबद्दलही माहिती दिली. त्यामुळे न कापता डोळ्यांची शस्त्रक्रिया केली जाते.

मुलांचा चष्म्याचा क्रमांक घालवण्याचा फॉर्म्युला
डॉ. सचदेवा यांनी सांगितले, लहान वयातच मुलांना मायनस चष्मा लागतो. ही मुले मायोपियाने पीडित असतात. त्यासाठी २०-२० चा फॉर्म्युला सुरू करणे गरजेचे आहे. जर तुम्ही एखाद्या वस्तूकडे नजर लावून एकटक बघत बसला असाल, तर दर २० िमनिटांनी २० वेळा डोळ्यांची उघडझाप करा. त्याने डोळ्यांचा ताण कमी होईल. हिरव्या भाज्यांमधून जीवनसत्त्वे मिळतात व डोळे निरोगी राहतात.
बातम्या आणखी आहेत...