आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्वजांच्या शोधात स्कॉटलंडचा निकोलस ग्रेव्सची हैदराबादमध्‍ये , रेल्वे अधिका-यांकडून मदतीचा हात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- दक्षिण मध्य रेल्वेकडे (एससीआर) सध्या एक वेगळे आव्हान आले आहे. स्कॉटलंडचे रहिवासी निकोलस ग्रेव्स दोन दिवसांपूर्वी भारतात आले आहेत. ते आपल्या पूर्वजांच्या शोधात आले आहेत. त्या कामी निकोलस यांनी दक्षिण मध्य रेल्वेचे सहकार्य मागितले आहे. निकोलस यांचे पणजोबा जेम्स थिआडोर १९३२ मध्ये निझाम रेल्वेमध्ये लोको फिटर पदावर नोकरीला होते. त्या वेळी त्यांचे कुटुंब लल्लागुडा (सिकंदराबाद) येथे राहत होते. त्यांचा जन्म १८९७ मध्ये भारतात झाला होता. निकोलस यांनी सोमवारी दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक पी. के. श्रीवास्तव यांच्याशी पणजोबांविषयी चर्चाही केली. त्याचबरोबर पूर्वजांच्या घराबद्दलही माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि तेथे जाण्याचीही इच्छा व्यक्त केली.

पेन्शन बुक दाखवले
थिआडोर यांची मुलगी आणि निकोलस यांची आजी फिलिस मार्गारेट चॅम्पियन यांचा १९२० मध्ये भारतात जन्म झाला होता. त्यांचा विवाह ब्रिटिश लष्करात कार्यरत असलेले पर्सी चॅम्पियन यांच्या झाला होता. १९३८ ची ही गोष्ट आहे. ते त्या वेळी लखनऊला नोकरीला होते. वास्तविक दुसरे महायुद्ध सुरू होण्याच्या अगोदर १९३९ मध्ये ते इंग्लंडला परतले होते. निकोलस यांना त्यांच्याविषयी अधिकची माहिती जाणून घेण्याची इच्छा आहे. त्यामुळेच त्यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी पणजोबांचे पेन्शन बुकदेखील श्रीवास्तव यांना दाखवले. निकोलस यांच्या धडपडीबद्दल श्रीवास्तव यांनी त्यांचे कौतुक केले.