आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Scuffle Between Nitish Manjhi Supporters In Bihar Cabinet Meet News In Marathi

बिहारमध्ये पुन्हा नितिशराज? विधिमंडळ नेतेपदी निवड, मांझींचा आडमुठेपणा कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- बिहारमधील सत्ताधारी जनता दलामधील (संयुक्त) अंतर्गत सत्तासंघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. जदयू अध्यक्ष शरद यादव यांनी बोलवलेल्या आमदारांच्या बैठकीवर बहिष्कार घालून बंडाचे निशाण फडकवणारे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी धक्का बसला आहे. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा नितिशकुमार राज येण्याची चिन्हे दिसत आहे.

बिहारचे माची मुख्यमंत्री नितिशकुमार यांची शनिवारी विधिमंडळनेते पदी निवड करण्यात आली. शरद यादव यांच्या नेतृत्त्वाखाली विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नितिशकुमार यांची एकमताने निवड झाली. दुसरीकडे, मुख्यंमंत्री मांझी यांचा अाडमुठेपणा कायम आहे. विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस आता राज्यपालांकडे करणार असल्याचे मांझी यांनी म्हटले आहे. यामुळे बिहारमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

दरम्यान, केंद्रीय नेतृत्त्वाविरोधात बंडखोरी केल्यामुळे बिहाराचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांना शनिवारी धक्का बसला. मांझी यांनी तातडीने कॅबिनेटची बैठक बोलावून आपले समर्थक मंत्री नरेंद्र सिंह यांना विधानसभा बरखास्त करण्‍याचा प्रस्ताव मांडण्यास सांगितले. मात्र, मांझी यांचा प्रस्ताव कॅबिनेटने धुडकावून लावला. मांझी यांना फक्त सात मंत्र्यांनी पाठिंबा दिला तर 22 मंत्र्यांनी वॉकआउट केले.
कॅबिनेटच्या बैठकीत प्रचंड गदारोळ झाला. त्यात मुख्यमंत्री मांझी समर्थक नरेंद्र सिंह आणि नीतीश समर्थक श्याम रजक यांच्यात झटापटी झाली. कॅबिनेटच्या बैठकीत या प्रस्ताव दोन तृतियांश सदस्यांनी पाठिंबा न मिळाल्याने तो कायदेशीररित्या राज्यपालांकडेही पाठवता आला नाही. शनिवारी सायंकाळी आमदारांची बैठक बोलवण्यात आली आहे. त्यात विधिमंडळ नेतेपदी नीतीशकुमार यांची निवड होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी राजीनाम्यासाठी वाढता दबाव पाहता पक्षाविरोधातच दंड थोपडले आहे. जदयूचे अध्यक्ष शरद यादव यांनी सात फेब्रुरुवारीला बोलावलेली विधिमंडळ पक्षाची बैठक बेकायदा असल्याचे सांगत बैठकीवर त्यांनी बहिष्कार घातला आहे.

विधिमंडळ पक्षाचा नेता मी आहे त्यामुळे बैठक बोलावण्याचा अधिकार मला आहे, असे मांझी यांचे म्हणणे आहे. मांझी यांनी 20 फेब्रुवारीला बैठक बोलावली असून राजीनाम्याच्या बातम्या खोट्या असल्याचेही म्हटले आहे. दरम्यान, जदयूने मांझी यांच्यावर कारवाईची धमकी दिली आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा,कॅबिनेटच्या बेठकीला वॉकऑऊट करणारे ‍नीतीशकुमार समर्थक मंत्री...