आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळू माफियांविरुद्ध लढणारी \'दुर्गा\' निलंबित, उत्तर प्रदेशचे अधिकारी नाराज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनौ- वाळू माफिया आणि गुन्‍हेगारांविरुद्ध लढणा-या एका महिला सनदी अधिका-याचे उत्तर प्रदेश सरकारने निलंबन केले आहे. याचा कळस म्‍हणजे, वाळू माफिया असल्‍याचे आरोप असलेल्‍या मंत्र्यावर या खात्‍याची जबाबदारी देण्‍यात आली आहे. निलंबनाच्‍या कारवाईवरुन आयएएस अधिका-यांच्‍या संघटनेने निषेध नोंदविला आहे.

उत्तर प्रदेशच्‍या गौतमबुद्धनगर जिल्‍ह्यात वाळू माफियांविरुद्ध मोहिम राबविणा-या जिल्‍हाधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांना निलंबित करण्‍यात आले आहे. दुर्गा नागपल या 2009 च्‍या तुकडीतील अधिकारी आहेत. गेल्‍याच वर्षी त्‍यांची ग्रेटर नोयडा येथील जिल्‍हाधिकारी म्‍हणून नियुक्ती करण्‍यात आली होती.

रघुनाथपुरा गावात शनिवारी रात्री एका मशिदीची भिंत पाडण्‍यात आली होती. त्‍यानंतर नागपाल यांचे निलंबन करण्‍यात आले. मुख्‍यमंत्री अखिलेश यादव यांनी हा प्रशासनाचा निर्णय असल्‍याचे सांगितले. जिल्‍हाधिका-यांनी एका धार्मिक स्‍थळाची भिंत पाडण्‍याचे आदेश दिले होते. त्‍यावरुन जातीय हिंसा भडकण्‍याची शक्‍यता होती. नरेंद्र भाटी यांनी याबाबत तक्रार केली होती, असे यादव यांनी ट्विटरवरुन सांगितले.