आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत सीलबंद पाणी बॉटलमध्ये निघाला जिवंत साप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा, मुख्यमंत्री रमणसिंह. - Divya Marathi
केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा, मुख्यमंत्री रमणसिंह.
रायपूर (छत्तीसगड) - छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमनसिंह, केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांची बैठक सुरु होती. त्यावेळी मंत्री महोदयांना पिण्यासाठी देण्यात आलेल्या पाण्याची बॉटलमध्ये एक जिवंत सापाचे पिल्लू आढळले. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

रायपूरमध्ये भाजप कार्यालयात महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री नड्डा, छत्तीसगडेच मुख्यमंत्री रमणसिंह आणि राज्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील आरोग्य अधिकारी पूनम यांना देण्यात आलेल्या पाण्याच्या बॉटलमध्ये सापाचे पिल्लू होते.

तपासणी न करताच पाणी बॉटलचे वाटप
केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमात विशेष सुरक्षेची काळजी घेतली जाते. त्यांना दिल्या जाणारे स्नॅक्स आणि पाणी यांची आधी तपासणी केली जाते. मात्र बुधवारी समोर आलेल्या प्रकारानंतर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना दिले जाणारे पाणी देखील तपासलेले नसल्याचे समोर आले आहे.
कंपनीचे तोंडावर बोट
भारतीय जनता पक्षाच्या बैठकींसाठी अमन अॅक्वा कंपनीकडून सीलबंद पाणी बॉटल मागवण्यात येतात. बुधवारी झालेल्या बैठकीसाठी देखील याच कंपनीचे पाणी सर्वांना देण्यात आले होते. झाल्या प्रकराबद्दल मात्र कंपनीने काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित फोटो