शिमला (हिमाचल प्रदेश)- पर्यटनासाठी जगप्रसिद्ध शिमला आणि लगतच्या भागात आज (शनिवार) मोसमातील पहिली हिमवृष्टी अनुभवायला मिळाली. येथील पर्वतांवर जोरदार पाऊस सुरु असल्याने तापमानात कमालिची घट झाली आहे. सर्वत्र बर्फाची चादर बघायला मिळत असून पर्यटकांची संख्या लक्षणिय वाढली आहे.
चालू मोसमात अपेक्षित वेळेवर हिमवृष्टी झाल्याने पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे आज हिमवृष्टी झाल्याने रविवारी आणि त्यानंतर जास्त संख्येने पर्यटक येण्याची शक्यता आहे. शिमल्याजवळ असलेल्या कुफरी, फागू आणि नारखंडा येथेही तुरळक स्वरुपात हिमवृष्टी झाली आहे. यामुळे येथील परिसराला अगदी स्वर्गाचे रुप मिळाले आहे. येथील दृष्य फारच नेत्रसुखद दिसत आहेत.
मनाली आणि किन्नाऊर येथेही हिमवृष्टी झाल्याचे वृत्त आहे, असे हवामान खात्याचे संचालक मनमोहनसिंग यांनी सांगितले.
शिमल्यात आता किमान तापमान 3.2 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आले. केयलॉंग येथील लाहूल आणि स्पिटीत सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली. येथे 3 डिग्री सेल्सिअस तापमान आहे.
धर्मशाला येथे 7.4, कल्पा येथे 0.2 आणि मनालीत 1.6 डिग्री सेल्सिअस किमान तापमान मोजण्यात आले.
पुढील स्लाईडवर बघा, शिमल्यात झालेली हिमवृष्टी... मनमोहक फोटो... फोटोंमध्ये बघा भारतातील स्वर्ग...