आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive : जया, अमिताभच नव्हे तर अभिषेक-ऐश्वर्याही त्यांच्याबरोबर राहत नाहीत : अमरसिंह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सुमारे 15 वर्षे जया बच्चन यांनी त्यांचे सासू सासरे (म्हणजे अमिताभ चे आई वडील हरिवंश राय-तेजी बच्चन) यांना अत्यंत वाईट वागणूक दिली. जया अमिताभ यांच्यासमोरच त्यांचा अपमान करत होत्या. अमिताभ चूप राहायचे. या नाराजीमुळेच अमिताभ आणि जया वेगळे झाले होते. ते वेगळे राहू लागले, आजही ते वेगळे राहतात. अमिताभ मुंबईच्या प्रतीक्षा बंगल्यात राहतात, तर जया जलसामध्ये. 30 वर्ष अमिताभ यांचे सर्वात जवळचे मित्र असलेल्या अमिर सिंह यांनी हा दावा केला आहे. याबाबत बच्चन कुटुंबीयांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. 
 
आमच्या प्रतिनिधीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी प्रथमच अमिताभ आणि जया बच्चन यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. तसेच सपातून हकालपट्टी झाल्यानंतर आता मुलायम नव्हे तर मोदी आवडते नेते असल्याचे सांगत इरादेही स्पष्ट केले आहेत. आमचे प्रतिनिधी रोहिताश्व मिश्रा यांच्याबरोबर दीर्घकाळ चाललेल्या या मुलाखतीत त्यांनी एकापाठोपाठ एक असे अनेक गंभीर आरोप केले आहेत. या मुलाखतीचा पहिला भाग आपण यापूर्वी वाचला आहे (आधीची मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा). त्यांनी अतर खुलासे या दुसऱ्या भागात देत आहोत. 
 
Q. तुम्ही म्हणतात की जया आणि अमिताभ वेगवेगळे राहतात, पण या दाव्याला आधार काय आहे? आणि ते आजही वेगवेगळेच राहतात का? 
A. - मी स्वतः असे म्हटलो नाही. तर लोकांनी माझ्यावर जया आणि अमिताभ यांच्यात भांडणे लावून त्यांना वेगळे केल्याचा आरोप केला. त्यावर मी म्हटलो की, मी जेव्हा अमिताभ यांनी भेटलो तेव्हा ते प्रतीक्षा बंगल्यात राहत होते. तर जया जलसा या बंगल्यात राहत होत्या. जया बच्चन यांची तेजी बच्चन आणि हरिवंश राय यांच्याशी चांगले वर्तन नव्हते. त्यामुळे अखेर व्यथित होऊन .. मी आधीही म्हणत होतो आणि अजूनही म्हणतो मी अमिताभ यांच्या रुपाने श्रावण बाळ पाहिला आहे. जेव्हा जया बच्चन यांनी तेजी बच्चन यांचा अपमान केला तेव्हा दुःखी झालेले अमिताभ आणि बांदा येथे गेले. त्यानंतर येथे दिल्लीतील गुलमोहर मार्ग येथील सोपान नावाच्या घरात राहू लागले. 
 
- जेव्हा आई वडील आजारी होते तेव्हा अमिताभ त्यांना घेऊन प्रतीक्षा बंगल्यावर गेले. त्याठिकाणीही जया यांची वागणूक पाहून त्यांनी पत्नीला एक वेगळे घर दिले आणि एकटे आई-वडीलांबरोबर दुसऱ्या घरात राहू लागले. आजही अमिताभ प्रतीक्षामध्ये राहतात आई वडीलांच्या मृत्यूनंतरही. आजही त्यांनी वडिलांचा चष्मा आमि पुस्तके जशीच्या तशी ठेवलेली आहेत. ते रोज त्याठिकाणी नतमस्तक होतात. जणू आताच हरिवंशराय तेथून उठून गेले असावेत असे वाटत असते. 
 
Q. अजूनही जया यांच्या वर्तणुकीला कंटाळून अमिताभ आणि जया बच्चन वेगवेगळ्या घरात राहतात?
A. हो वेगवेगळ्या घरात राहतात. तिघेही वेगवेगळे राहतात. अभिषेक-ऐश्वर्या वेगळे राहतात, जया वेगळ्या राहतात आणि अमिताभही वेगळ्या घरात राहतात. 
 
Q. हे सर्व मनाने ठरवून होत आहे की, परिस्थितीच अशी आहे?
A. मी याबाबत जास्त काही बोलणार नाही. कदाचित उद्धटपणा असेल. मी तर माझ्यावरील आरोपांवर उत्तर देत आहे, की मी यांना वेगळे केलेले नाही. त्याचे कारण मी सांगितले आहे. 
 
Q. मग काय अमिताभ जया यांच्या जीवनातील मतभेद अजूनही कायम आहेत?
A. मी यावरही उत्तर देणार नाही. पण ते सोबत राहत नाहीत. जेव्हा मी त्यांनी (अमिताभ) प्रथम भेटलो होतो, तेव्हाही त्या (जया) त्यांच्याबरोबर एकत्र राहत नव्हत्या. 
 
Q. बच्चन कुटुंबाशी एवढी नाराजी का?
A. अनेक वर्षांपर्यंत अमिताभ बच्चन हे माझे नीकटवर्तीय आणि घनिष्ट मित्र राहिलेले आहेत. जोपर्यंत ते माझे मित्र होते, तोपर्यंत मी त्यांच्यावर खूप प्रेम केले. पण जेव्हा मला अमिताभ यांची खरी ओळख झाली, त्यानंतर मात्र मी त्यांच्याकडे फिरुन पाहिलेही नाही. कोणत्याही कार्यक्रमात जरी ते दिसले तरी, मी त्याठिकाणाहून काढता पाय घ्यायचो. अमिताभ यांचा स्वभाव लक्षात आल्यानंतर मी जो निर्णय घेतला, माझ्या मते मी माझ्या जीवनातील घाण स्वच्छ केली. 
 
Q. पनामा केसमध्ये अमिताभ बच्चन यांचे नाव आले आहे. या प्रकणी ते दोषी असून तुरुंगात जातील असे तुमचे म्हणणे आहे.. पण मग अद्याप काही कारवाई का झाली नाही? 
A. अमिताभ राष्ट्रपती बनतील अशी चर्चा आहे. पण आधी पनामा प्रकरणात सुप्रीम कोर्टाची नोटीस तर त्यांनी टाळून दाखवावी. काळ्या पैशाचे प्रकरण आहे. पनामामध्ये खर्च केलेला पैसै कोणाचा होता, तो कसा खर्च झाला हे अमिताभ यांनी सांगावे. त्यावेळी अॅटोमॅटिक रिमेटेंसी स्कीम नव्हती. जोकटिया, दादी बलसारा आणि सरोज जायवाला हे तिघेही यात समाविष्ट होते. त्यापैकी दोघे मरण पावले असून सरोज जायवाला जीवंत आहेत. सुप्रीम कोर्टाची नोटीस मिळताच सरोज जायवाला सर्व काही सांगून टाकतील. 
 
 Q. तुमचा फेव्हरेट नेता कोण आहे, मोदी, सोनिया की मुलायम?
A. निश्चितपणे मोदी माझे फेव्हरेट आहेत. त्याचे कारण म्हणजे ते कधी पलटी मारत नाहीत. सोनियाजी तर आजारी आहेत. मुलायम मला वैयक्तिकरित्या खूप आवडतात पण राजकीय दृष्ट्या तसे नाही. पुन्हा पुन्हा पलटी मारणे बंद केले तर तेही काही छोटे नेते नाहीत. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, मुलामय सिंह अमर सिंहांना घाबरतात कारण त्यांच्याकडे मुलायम यांची एक सीडी आहे.. या प्रश्नावर काय म्हणाले अमिर सिंह.. सोबतच वाचा इतरही अनेक खुलासे..
 
बातम्या आणखी आहेत...