आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UP मध्ये 67 जागांसाठी सकाळी 9 वाजेपर्यंत 10.75% मतदान; उत्तराखंडमध्ये मतदान सुरु

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात आज बुधवारी मतदान होत आहे. 11 जिल्ह्यात 67 जागांसाठी सकाळी 9 वाजेपर्यंत 10.75 टक्के मतदान झाले. या टप्प्यात 721 उमेदवार नशीब आजमावत आहेत. दरम्यान 11 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यात  64.17 टक्के मतदान झाले होते.

हेही वाचा...UP मध्ये दुसर्‍या टप्प्यात मतदान, 67 जागांसाठी 256 कोट्याधीश तर 107 गुन्हेगार उमेदवार

दुसरीकडे, उत्तराखंडमध्येही आज 70 पैकी 69 जागांसाठी मतदान सुरु झाले आहे. पंतप्रधानांनी मतदारांना केले आवाहन... 
- नरेंद्र मोदी यांनी बुधवार सकाळी ट्वीट केले आहे. "उत्तर प्रदेशात आज दुसर्‍या टप्प्यात मतदान होत आहे. सर्व मतदारांनी लोकशाहीच्या पवित्र उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. मतदानाचा हक्क बजवावा, अशी विनंती.' 
- नरेंद्र मोदींनी दुसरे ट्वीट उत्तराखंडमधील जनतेला केले आहे. "उत्तराखंडमध्ये आज मतदान होत आहे. सर्व मतदारांना विनंती आहे की, त्यांनी मोठ्या संख्येने मतदान करावे. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा.'

720 उमेदवार मैदानात आहेत. यापैकी ६९ म्हणजे १० टक्के महिला आहेत. एकूण २.२८ कोटी मतदार आहेत. यापैकी १.२४ कोटी पुरुष आणि १.०४ कोटी महिला मतदार आहेत. यातील ६७ जागांवर मुस्लिम मतदारांची संख्या ३३. ०१ टक्के इतकी आहे.
 
या टप्प्यात बहुतांश जागा मुस्लिमबहुल भागातील आहेत. हा भाग सपाचा बालेकिल्ला मानला जातो.  प्रमुख पक्षांनी ७५ मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवले आहेत, तर भाजपने एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही. ६७ पैकी १२ जागा आरक्षित आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत या भागातून सपाला ३४ जागा मिळाल्या होत्या, तर दुसऱ्या स्थानावर बसपा -१८, भाजप-१०, काँग्रेसला ३ तर इतर जागांवर २ उमेदवार विजयी झाले. सर्वाधिक २२ उमेदवार बिजनोरच्या बरहपूर आणि कमीत कमी ४ अमरोहातील धनोरा जागेवर निवडणूक लढवत आहेत.  असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफार्म्स (एडीआर)द्वारे दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक मैदानात उतरलेल्या ७२१ पैकी ७१९ उमेदवारांच्या शपथपत्रानुसार १०७ उमेदवारांवर गुन्हेगारी स्वरुपाचे खटले चालू आहेत. 

६७ जागांवर प्रमुख पक्षांनी ७५ मुस्लिम उमेदवार उतरवले, भाजपचा एकही नाही.  
> ज्या ११ जिल्ह्यांत निवडणूक हाेत आहे. त्यापैकी ६ जिल्ह्यांत मुस्लिमांची लोकसंख्या ३३ % हून जास्त आहे.  
> ९ जागांवर ३-३ मुस्लिम उमेदवार मैदानात २  
> ४ जागांवर प्रमुख पक्षांचे २- २ उमेदवार  
> २० जागांवर एक -एक मुस्लिम उमेदवार  
> बसपाने २६, सपा- काँग्रेस आघाडीने २५ तर रालोदने १५ मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवले आहेत.  
 
तीन मोठे मुद्दे  
> बदायूंमध्ये दोन बहिणीवर बलात्कार - बदायंूमध्ये दोन चुलत बहिणीवर बलात्कार करून मृतदेह झाडाला लटकवले होते. प्रकरण सीबीआयकडे गेले. 
> शहाजहांपूरमध्ये पत्रकाराची हत्या- पत्रकार जगेंद्रसिंग यांना जिंवत जाळण्यात आले. जगेंद्र यांनी मॅजिस्ट्रेटसमोर दिलेल्या जबाबात अखिलेश मंत्रिमंडळातील राममूर्ती वर्मा यांनी हत्या केल्याचे सांगितले होते.  
> ट्रिपल तलाक- दारूल उलूम देवबंद यांनी फतवा काढला : तलाकसाठी महिला उपस्थित पाहिजे असे नाही. यूपी निवडणुकीत हा मोठा मुद्दा आहे.
 
कोणत्या पक्षाचे किती उमेदवार  
बसप 67
भाजप 67
काँग्रेस 18
सपा 51
रालोद 53
>एनसीपी-3, सीपीआय (एम)-4, अपक्ष-207, इतर पक्ष-247
 
गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचे निकाल  
पक्ष    2012     2014
    (मत-जागा)     (मत-जागा)
भाजप    17.3%(10)  41.6%(49)
सपा    28.4%(34)  27.3%(15)
काँग्रेस    13.1%(3)      8%(2)
बसप     24%(18)      18.9%(1)
अन्य    17.2%(2)      4.2%(0)
 
युपीमध्ये साक्षरतेचे प्रमाण ६८ % आहे, तर दुसऱ्या टप्प्यात ज्या ६७ जागांवर मतदान होत आहे तेथे  सरासरी ५१ % मतदार साक्षर आहेत.
 
चार मोठे चेहरे
आझम खान - रामपूर (सपा)  
सपाचा मुस्लिम चेहरा. वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. रामपूरमधील नवाबांचे वर्चस्व संपुष्टात आणले.  
 
जितेन प्रसाद - शहाजहांपूर (काँग्रेस)  
काँग्रेसचे माजी खासदार जितेन प्रसाद २०१४ मध्ये शहाजहांपूर येथून निवडणूक पराभूत झाले. जितेन राहुल गांधी यांच्या जवळचे.
 
इम्रान मसूद -सहारणपूर (काँग्रेस)  
लोकसभा निवडणुकीत मोदींचे तुकडे तुकडे करणारे वक्तव्य करणारे उमेदवार.  
राहुलनी त्यांना कोअर टीममध्ये स्थान दिले. 
 
अब्दुल्ला आझम खान - रामपूर (सपा)  
अब्दुल्ला अनेक वर्षांपासून वडील आझम खान यांचा प्रचार करतात. आता स्वार येथून निवडणूक लढवत आहेत. या भागात नरेंद्र मोदी यांचे चार कॅबिनेट मंत्री आहेत.  पिलीभीतमधून मनेका गांधी, रामपूरचे मुख्तार अब्बास नक्वी, शहाजहांपूरचे कृष्णा राज आणि  बरेलीच्या संतोष गंगवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
 
उत्तराखंड निवडणुकीत आज ६९ जागा, ६२७ उमेदवारांचे भवितव्य
एकूण मतदार 75.12 लाख
>महिला :35.7 लाख
>पुरुष: 39.3 लाख
 
भाजप - काँग्रेसचे ७०-७०  उमेदवार  
> सर्वाधिक उमेदवार : धरमपूर (रायपूर)येथून 19
> सर्वात कमी उमेदवार : चकराता (पुरोला) 4
> महिला उमेदवार : 62

उत्तराखंडातील मोठे उमेदवार  
हरीश रावत : हरिद्वार ग्रामीण आणि उधम सिंगनगर  
सत्पाल महाराज : चौबट्टाखाल मतदारसंघ- भाजप  
हरकसिंग रावत : रुद्रप्रयाग मतदारसंघ - भाजप  
किशोर उपाध्याय  :  टिहरी मतदारसंघ - काँग्रेस
बातम्या आणखी आहेत...