आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅनलला मुलाखत देऊन DSP ने घेतला गळफास, मंत्री-अधिकाऱ्यांवर केले आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेंगळुरू (कर्नाटक) - कोडागू जिल्‍ह्याचे डीएसपी एम. के. गणपती (51) यांनी गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्‍याचा प्रकार उघडकीस आला. विशेष म्‍हणजे बुधवारी त्‍यांनी एका स्‍थानिक वृत्‍तवाहिनीला मुलाखत दिली होती. यात त्‍यांनी मंत्री आणि वरिष्‍ठ अधिकाऱ्यांच्‍या जाचाला आपण कंटाळलो असल्‍याचे म्‍हटले होते. त्‍यांनी आत्‍महत्‍येपूर्वी एक पत्रही लिहून ठेवले आहे.
विशेष म्‍हणजे कर्नाटकमध्‍ये 3 दिवसांत वरिष्‍ठ पोलिस अधिकाऱ्याची ही दुसरी आत्‍महत्‍या आहे. यापूर्वी मंगळवारी बेळगावचे डीएसपी कलप्पा हंदिबग यांनी आत्‍महत्‍या केली. त्‍यांच्‍यावर 10 लाखांची लाच घेतल्‍याचा आरोप होता.
एम. के. गणपतींनी केले वरिष्‍ठ अधिकारी आणि मंत्र्यांवर आरोप...
> एम. के. गणपती यांनी कुर्ग जवळ असलेल्‍या मदिकेरीच्‍या एका लॉजमध्‍ये आत्‍महत्‍या केली. गळफास घेतला तेव्‍हा ते गणवेशात होते. शिवाय त्‍यांच्‍या कंबरलेला बंदुकीही होती.
> या खोलीत एक सुसाइड नोटसुद्धा सापडली.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, वृत्‍तवाहिनीला दिलेल्‍या मुलाखतीत काय म्‍हटले होते... सुसाइड नोटमध्‍ये काय लिहिले...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...