गुलबर्गा (कर्नाटक)- सिकंदराबादहून मुंबईला जाणारी 12220 दुरंतो एक्स्प्रेसचे नऊ डबे शनिवारी पहाटे रुळावरुन घसरले. या दुर्घटनेत दोन महिला प्रवाशांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहे.कर्नाटकातील कलबुर्गीपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या मारटूर स्टेशनवर ही दुर्घटना झाली. बचावकार्य सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रुळाला तडे गेल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
पुणे रेल्वे विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले की, शाहबाद स्टेशनहून ही एक्स्प्रेस मध्यरात्री 2 वाजता सुटली होती. तेथून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या मारटूरजवळ 2 वाजून 15 मिनिटांनी दुर्घटना घडली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभु या दुर्घटनेसंदर्भात माहिती जाणून घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना तातडीने मदत जाहीर केली आहे.
दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबाला दोन लाख रुपये देण्यात येणार असल्याचे भारतीय रेल्वेने जाहीर केले आहेत. रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी (पीआरओ)अनिल सक्सेना यांनी सांगितले की, एनडीआरएफचे हैदराबाद व पुणे येथील दोन पथके घटनास्थळी पाठवण्यात आले आहे.
हेल्पलाईन क्रमांक :गुलबर्गा : 0847-2255066 / 2255067
सिकंदराबाद : 040-27700968
सोलापूर : 0217-2313331
सीएसटी : 022-22694040
एलटीटी कुर्ला : 022-25280005
कल्याण : 0251-2311499
पुढील स्लाइड्सवर पाहा, सिकंदराबाद- मुंबई दुरंतो एक्स्प्रेसच्या दुर्घटनेचे फोटोज...