आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुप्तचर यंत्रणेला मिळाले दाऊदचे 2 व्हिडिओ; कराची, बांगलादेश सीमेजवळ दिसला डॉन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो)
नवी दिल्ली - गुप्तचर संस्थांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या हालचालींसंदर्भातील दोन नवे व्हिडिओ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांना सुपूर्त केले आहेत. यापैकी एका व्हिडिओमध्ये दाऊद कराचीमध्ये आयएसआयच्या अधिका-यांशी चर्चा करताना आढळून आला आहे. तर दुस-या व्हिडिओमध्ये बांग्लादेश बॉर्डरजवळ आढळला आहे. या दोन्ही व्हि़डिओमध्ये दाऊदची ओळख पटली आहे.

भारतीय गुप्तचर संस्थांबरोबरच अमेरिकेची तपास संस्था एफबीआयही दाऊदच्या हालचालींवर करडी नजर ठेवून आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुप्तचर यंत्रणांना याबाबत गांभीर्याने तपास करून इतर तपास संस्थांची मदत करण्याचे निर्देशही दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील एनडीए सरकार दाऊच्या विरोधात निर्णायक पाऊल उचलण्याची शक्यता आहे. त्यामुळेच गुप्तचर पथके दाऊदवर लक्ष ठेवून आहेत. काही दिवसांपूर्वी याच पथकाने ईदच्या वेळी नमाजसाठी गेलेला दाऊद पाकिस्तान-अफगानिस्तानच्या सीमेवर आढळल्याचा अहवाल सादर केला होता.

दाऊद हा मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण, बनावट नोटा आणि भारत विरोधी कारवायांमध्ये आयएसआय आणि इतर दहशतवादी संघटनांच्या मदतीने महत्त्वाची भूमिका बजावत आला आहे. भारतात त्याच्याविरोधात अनेक प्रकरणे दाखल आहेत.

भारताने पाकिस्तानकडे अनेकवेळा दाऊदला ताब्यात देण्याबाबत मागणी केली आहे. हे सर्व व्हिडिओ आणि रिपोर्ट भारत दाऊद पाकिस्तानात अशल्याचा पुरावा म्हणून वापरणार आहे.