आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाझियाबादच्या हिंडन एअरबेसमध्ये संशयिताची घुसखोरी, सुरक्षा दलांनी झाडली गोळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाझियाबाद - गाझियाबादमध्ये वायुदलाच्या हिंडन एअरबेसमध्ये मंगळवारी रात्री उशिरा एका संशयित व्यक्तीने घुसखोरीचा प्रयत्न केला. त्या वेळी त्याला सुरक्षा दलांनी पाहिले. त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु तो थांबला नसल्याने त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. या कारवाईत संशयित जखमी झाला. त्याच्या पायाला दुखापत झाली. दुसरीकडे, संशयित म्हणाला की त्याला फक्त तेथे बसायचे होते.
> ही घटना मंगळवारी रात्री उशिरा 10.30 वाजता घडली. या व्यक्तीचे नाव सुजितकुमार असून उत्तर प्रदेशच्या प्रतापगडचा तो रहिवासी असल्याचे कळले. 
पोलिस म्हणाले, तो तीन वर्षांपासून दिल्लीच्या आनंद विहारमध्ये राहतो व मजुरीकाम करतो.
 
काय आहेत आरोप
> एसएसपी हरिनारायण सिंह म्हणाले- "मंगळवारी रात्री 10.30 वाजता या व्यक्तीने एअरबेसच्या प्रतिबंधित क्षेत्रात भिंतीवरून उडी मारून आत शिरण्याचा प्रयत्न केला होता." तथापि, या एयरबेसवर परवानगीशिवाय प्रवेश करणाऱ्याला गोळी मारण्याचे आदेश आहेत.
 
काय म्हणतो घुसखोर?
> सुजीत कुमार म्हणाला- "माझ्या जवळ खाण्यासाठी काहीही नव्हते. मला फक्त तेथे बसायचे होते. मी यापुढे कधीही तिथे जाणार नाही. या घटनेनंतर गाजियाबादच्या एका हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. सुजीतची तब्येत आता ठीक असल्याचे कळते.
बातम्या आणखी आहेत...