आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षा दलाची चकमक; तीन दहशतवादी ठार, एका नागरिकाचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर : काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यातील हुसेनपोरा भागात सुरक्षा दलाने दहशतवाद्यांशी झालेलया चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार केले. पण याच ठिकाणी लपलेला लष्कर ए तोयबाचा कमांडर अबु दुजाना बुधवारीच पळून जाण्यात यशस्वी ठरला. या घटनेत एका नागरिकाचा मृत्यू झाला तर अन्य एकजण जखमी झाला.

सैन्यदलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हुसेनपोरा गावात बुधवारी संध्याकाळी सर्च ऑपरेशन करण्यात आले होते. परंतु येथील लोक दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरले. त्यानंतर या भागातून दहशतवादी पळून गेले. परंतु ते फार दूर न जाता एका गावात लपून बसले. तेव्हा अतिरिक्त जवानांच्या तुकडीस पाचारण करुन गुरुवारी सकाळपासून सर्च ऑपरेशन सुरू झाले. या दरम्यान दहशतवाद्यांशी चकमक सुरु होती.
यावेळी झालेल्या चकमकीत ३ दहशतवादी ठार झाले. ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली असून तिघे पश्चिम काश्मिरचे रहिवाशी होते. चकमक चालू असताना या भागातील जनता मध्ये रस्त्यावर उतरुन दहशतवाद्यांना पळून जाण्यास मदत करत होते. यामध्ये दोन नागरिक गोळीबाराच्या टप्प्यात आल्याने एकाचा मृत्यू झाला तर
एकजण गंभीर जखमी झाला.

दहशतवाद्यांनी बँक लुटली
श्रीनगर : दहशतवादा्ंनी पुलवामा जिल्ह्यात एका बँकेतून १० लाख रुपये लुटून नेले. नोटबंदीनंतर दहशतवादी संघटनांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून ते आता बँका लुटत आहेत.
गुरुवारी सकाळी अरीहाल भागातील बँक उघडल्यानंतर चार दहशतवादी दोन वाहनांतून आले होते. कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांना कोपऱ्यात बसवले. बँकेतून १० लाख रुपये घेऊन फरार झाले. पोलिसांनी शोध माेहिम राबवली. पण त्यात त्यांना यश आले नाही.
बातम्या आणखी आहेत...