आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Security Increased On Indo Pak International Border

भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर सुरक्षा वाढली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर (आयबी) सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) १२०० जवान या ठिकाणी तैनात करण्यात आले असून त्यांना सीमेवर २४ तास पेट्रोलिंग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ९२ किलोमीटर लांबीच्या सीमेवर बीएसएफने १२ कंपन्या तैनात केल्या आहेत. प्रत्येक सेक्टरमध्ये जवानांची संख्या वाढवण्यात आली असून त्यांना अखंडित पेट्रोलिंग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कठुआ जिल्ह्यापासून अखनूर सेक्टरपर्यंत आंतरराष्ट्रीय सीमेवर अनेक नाले येतात. त्या ठिकाणी तारांचे कुंपण बसवण्यात आलेले नाही. या मार्गाचा वापर दहशतवादी घुसखोरीसाठी करतात.