आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समोर आले हनीप्रीतच्या बेडरूमचे सीक्रेट, बुलेटप्रूफ खोलीत आढळले हे सामान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाला - कोर्ट कमिश्नर ए.के.एस. पवार यांनी पंजाब-हरियाणाच्या हायकोर्टात बाबा राम रहीमच्या 'गुफा'चा अहवाल सोपवला होता. बुधवारी याबाबत खुलासा झाला आहे, बाबाचा हा महाल हायटेक सुविधांनी युक्त होता. या गुफेला 'तेरा वास' नावानेही ओळखले जायचे. अहवालात असे म्हणण्यात आले आहे की, गुफेला लागूनच हनीप्रीतची बेडरूम होती.

 

महालात लावलेले होत्या बुलेटप्रूफ काचा...
- सर्च ऑपरेशनदरम्यान राम रहीमच्या महालात बनलेल्या बेडरूममध्ये 6 खिडक्या आहेत. यात बुलेटप्रूफ काचा लावण्यात आलेल्या आहेत. रूममध्ये अनेक लहान-मोठ्या अलमाऱ्या होत्या.
- या अलमाऱ्यांच्या रॅकमध्ये कपड्यांसह ज्वेलरी, महागड्या घड्याळी ठेवलेल्या होत्या. रूममध्ये इेवलेल्या बेडजवळ लाकडी ड्रॉवरमध्ये काही औषधीही ठेवण्यात आलेल्या होत्या.

-बेडरूमसह चेंजिंग रूमही आहे. याच्या डेकोरेशनसाठी फ्लॉवर पॉट ठेवण्यात आले आहेत. या खोलीतच लिफ्टही आहे. या खोलीत असलेल्या गोलाकार पायऱ्या छतावर जातात.
- ड्रेसिंग रूममध्ये विदेशातून इम्पोर्टेड मिनरल वॉटर, डिझायनर ड्रेसेस, स्पोर्टस शूज, ट्रॅक सूट ठेवलेले आहेत. अनेक रॅकमध्ये छोटेमोठे शंख, महागडे गिफ्टचे डबे तसेच रजाई व ब्लँकेटही ठेवलेले आहेत.
- मेन हॉलमध्ये तीन सोफा सेट, प्लास्टिक चेअर, टेबल आहे. हॉलच्या एका बाजूला पाच रूम बनवलेल्या आहेत. यात अगोदर किचन आहे.

 

खोलीत आढळले मसाज ऑइल
- राम रहीमच्या सीक्रेट महालात फर्स्ट फ्लोअरवर गार्डनला अटॅच आहे. तर दुसरा मजला भुयाराला जोडलेला आहे. सर्च ऑपरेशनदरम्यान या भुयारांना बंद करण्यात आले होते.
- बेडरूममध्ये महिलांचे कपडे, आर्टिफिशियल ज्वेलरी आणि अनेक तऱ्हेचे ब्यूटी प्रॉडक्ट मिळाले. या सर्व वस्तू हनीप्रीत इन्साचे आहे, जी याच महालात राहत होती.
- एका खोलीतून मसाज ऑइलही हस्तगत करण्यात आले. हनीप्रीत राम रहीमची मसाजही करत होती, यामुळेच राम रहीमने जेल अधिकाऱ्यांना तिला आपल्यासोबत ठेवण्याची मागणी केली होती.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...