आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कणीस विकणाऱ्या मुलीस पाहून हॉटेलची बनवली शाळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामगड - शिकण्या-सवरण्याच्या वयात मुलांना काम करावे लागल्याचे पाहून हॉटेलचालक अरुण सिंह यांच्या मनात वेगळा विचार आला आणि त्यातून त्यांची नवी ओळख निर्माण झाली आहे. आपल्या हॉटेलच्या बेसमेंटमधील हॉलमध्ये ते गरीब घरातील मुलांना शिक्षणाचे धडे देत आहेत. या मुलांनीही शिकून समाजात योगदान द्यावे, अशी जिद्द त्यांनी बाळगली आहे. त्यासाठी त्यातील २२ जणांना प्रतिष्ठित शाळांमध्ये प्रवेश दिला आहे. अरुण सिंह या सर्वांचा खर्च स्वत: उचलतात.

अरुण म्हणाले, एके दिवशी लहान मुलगी मक्याचे कणीस विकताना दिसली. तिला विचारले शिकतेस का? नकारार्थी मान हलवत कणीस घेण्याची विनवणी केली. मी त्याच दिवशी ठरवले की, यापुढे गरीब मुलांना शिकवणार.

२१,००० गरीब मुलांना शाळेत पाठवण्याचे उद्दिष्ट
समाजातील सधन लोक एक किंवा दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलू शकतात. मी स्वत: अशा २१,००० मुलांचा खर्च उचलण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आम्ही वैयक्तिक स्तरावर अशा मुलांचा शोध सुरू केला आहे. त्यांना आम्ही निश्चित शिकवू, असे अरुण यांनी सांगितले.

अध्यक्षांकडून मदत
निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी गणिनाथ शाळेचे अध्यक्ष जितेंद्र प्रसाद डब्ल्यू. यांची भेट घेतली. त्यांना सर्वकाही सांगितले. जितेंद्र मदतीसाठी तयार झाले. त्यांच्या सहकार्यातून जवळपास २२ गरीब घरातील मुलांना प्रवेश दिला आहे. त्यांनी शिक्षणासह पेन-पुस्तकाच्या खर्चाचीही जबाबदारी उचचली. यानंतरही काही मुलांना शिकवण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, अपुऱ्या जागेमुळे मी स्वत:च्या हॉटेलमध्ये स्वतंत्ररीत्या शिकवण्याची व्यवस्था केली आहे. जवळपास २५ मुले इथे दररोज शिकण्यासाठी येतात.
बातम्या आणखी आहेत...