आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे बिरला ग्रुपचा एकुलता एक वारसदार, स्वत:ची ओळख बनवण्यासाठी करतोय हे काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर्यमन बिरला - Divya Marathi
आर्यमन बिरला
भोपाळ- अरबोंची संपत्तीचा वारसदार असलेल्या मालकाचा एकुलता एक मुलगा मध्य प्रदेशच्या छोट्या शहरांमध्ये मातीसोबत खेळतोय. आता त्याच्या स्वप्नांना पंख मिळाले आहेत. आम्ही सांगत आहोत देशातील सर्वांत श्रीमंत कुटुंबांपैक एक असलेल्या बिरला परिवाराचा वारदास आणि कुमार मंगलम बिरला यांचा मुलगा आर्यमन विक्रम बिरला याच्याविषयी. सोमवारी मध्यप्रदेशमध्ये रनजी क्रिकेट टीमसाठी त्याची निवड झाली आहे. सलग उत्कृष्ट खेळामुळे त्याची एमपी रणजी टीममध्ये निवड कऱण्यात आली आहे. आपल्या स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी तो कठोर मेहनत करत आहे. क्रिकेटच्या पॅशनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून तो आपल्या फॅमिलीपासून दूर आहे, त्याची संपूर्ण फॅमिली मुंबईत राहते.

divyamarathi.com सोबत खास चर्चेत बोलताना आर्यमनने सांगितले की, एमपी रणजी टीममध्ये निवड ही त्याच्यासाठी अतिशय महत्वाच बाब आहे. फोनवर बोलताना तो टीमच्या खेळाडूंसोबत बसमध्ये प्रवास करत होता. तो म्हणला, मला गर्व आहे की मी एमपी क्रिकेट टीममध्ये खेळत आहे. तीन वर्षांपूर्वी त्याला रीवा टीममधून खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले.

लेफ्ट हँडेड बॅट्समॅन आणि अंडर-23 सीके नायडू ट्रॉफीसाठी एमपी टीमसाठी त्याने सलग दोन शकतके आणि एक दुहेरी शतक ठोकून निवडकर्त्यांचे लक्ष आफल्याकडे खेचून घेतले. त्याने उडीसाविरद्ध सामन्यात 153 रन आणि उत्तर प्रदेश विरूद्ध सामन्यात 140 रन केले होते तसचे 5 विकेटही घेतल्या होत्या. सागरमध्ये झालेल्या छत्तीसगढ विरोधातील सामन्यात त्याने शानदार दुहेरी शतक ठोकताना 230 धावांची खेळी केली होती.

स्वत:ची ओळख बनवण्याचे स्वप्न...
- आर्यमन विक्रम बिरलाचे स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याचे स्वप्न आहे. याच सप्नासाठी तो जगत आहे. आपल्या नावासमोर लागलेल्या बिरला या आडनावाचा टॅग सोपा नाही असे तो मानतो. त्याने सांगितले की, माझे बिजनेस टायकून वडिल कुमारमंगलम बिरला यांच्या मुलाच्या नावाने नाही तर आपल्या स्वत:च्या नावाची ओळख प्रस्तापित करायची आहे.

संकटांना समोर जाणे शिकलो...
कुमार मंगलम आणि नीरजा बिरला यांचा मुलगा आर्यमन सांगतो की, घरापासून दूर जाने सोपे नव्हते, परंतु मला वाटते की, मी जो आनंद किंवा संकटे निवडली आहेत, तो माझा स्वत:चा निर्णय आहे. माझ्यासाठी दोन वर्ष अजिबात सोपे नव्हते, परंतु आता मी यासाठी तयार झालो आहे आणि माझे संकटांवर प्रेम आहे. एक लक्झरीअस आयुष्य सोडून एका छोट्या शहरात राहणे कसे असू शकते असे विचारल्यावर आर्यमनने सांगितले की, माझे मुख्य लक्ष नेहमी माझा क्रिकेटवर काम करणे हे होते, यासाठी मी काहीही करण्यास तयार होतो. मला त्याची खूप अशी चिंता कधीच वाटली नाही.

जेव्हा मुंबईकडून खेळण्याचा विचार सोडला...
आर्यमन विक्रमने क्रिकेटचे करियर निवडले परंतु, लकरच कळाले की बाहेरचा रस्ता एवढा सोपा नाही. भारताचे माझी फलंदाज कोच प्रवीण अमरे आणि जगदीश शेट्टी यांच्यासमोर मुंबई च्या खेळांडूंसोबत चांगले प्रदर्शन करूनही जूनियर लेवलवर मुंबई टीममध्ये निवड नाही होऊ शकली. यामुळे निराश झालेल्या आर्यमने मुंबईची टोपी घालण्यासाठी आपले स्वप्न सोडले आणि त्याऐवजी मध्य प्रदेस जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी रीवासारख्या छोट्या शहरात जाऊन तो क्रिकेट खेळला.  आर्यमनने सांगितले की, तीन वर्षांपूर्वी एक संधी मिळाली आणि ती मी लगेच घेतली. मी यासाठी एमपीसीएचे खूप आभार मानतो. रणजी टीममध्ये निवड होणे ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे, आता मी माझे लक्ष क्रिकेटवर केंद्रीत करत आहे.
 
आई-वडिलांनी नेहमी सपोर्ट केला....
बहिन अनन्या बिरला एक पॉप गायिका आहे आणि तिचे दोन अलबम देखील लाँच झाले आहेत. तर, आर्यमन एक क्रिकेटर बनला आहे. मग वडिल कुमार मंगलम यांनी तुम्हाला बिजनेस संभाळण्यास सांगितले नाही का? असा प्रश्न विचारल्यानंतर आर्यमन म्हणाला, माझे आई-वडिल दोघेही अतिशय सपोर्टीव आहेत. त्यांनी मला स्वप्न जगण्याचे स्वतंत्र्य दिले आहे. ते नेहमी म्हणतात की, तुम्ही जे काय करत आहात ते संपूर्ण लक्ष देऊन केले पाहिजे...

पुढील स्लाइडवर पाहा आणखी फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...