आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Selectors Wanted To Sack MS Dhoni Says Former Selector

तर 2012 मध्येच झाली असती धोनीची गच्छंती, माजी Selector चा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - निवडसमितीतील माजी सदस्य राजा व्यंकट यांनी कसोटी कर्णधारपदाबाबत गंभीर आरोप केला आहे. बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी विरोध केला नसता तर 2012 मध्येच विराट कोहलीला वन डेचे कर्णधारपद देण्यात आले असते, अशा दावा व्यंकट यांनी केला आहे. ते 2011-2012 मधील निवड समितीचे सदस्य होते.
बंगाली वृत्तपत्र 'ऐईबेला'साठी लिहिलेल्या एका लेखात व्यंकट यांनी लिहिले आहे की, "2011 च्या अखेरीस आणि 2012 च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघात अनेक गट तयार झाले होते. अनेक सलेक्टर्स धोनीच्या जागी कोहलीला कर्णधार बनवण्यास इच्छूक होते. त्याचे कारण म्हणजे टीमधील एकता टिकवण्यासाठी एखाद्या तरुणाकडे टीमचे नेतृत्व सोपवण्याची सर्वांची इच्छा होती.

आम्ही तीन वर्षांपूर्वीच धोनीला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी आम्ही प्रयत्नही केले होते. पण श्रीनिवासन यांच्यामुळे त्या प्रयत्नांना यश आले नाही, असे व्यंकट यांचे म्हणणे आहे. परदेशातील दौऱ्यासाठी संघाची निवड करत असताना बीसीसीआयच्या अध्यक्षांना नाराज करून चालत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. नवीन कर्णदार व्हावा असे आम्हाला वाटत होते, पण श्रीनिवासन यांची तशी इच्छा नव्हती असे व्यंकट यांचे म्हणणे आहे.

विराटचे नाव समोर येण्याची कारणे
व्यंकट म्हणाले की, 2010-2011 मध्ये देवधर ट्रॉफीमध्ये उत्तर विभागाचे नेतृत्व करणाऱ्या कोहलीने त्याच्या क्षमतेवर सर्वांवर प्रभाव टाकला होता. आगामी काळात कोहली हा एक यशस्वी कर्णधार बनू शकतो, याची जाणीव तेव्हाच झाली होती, असेही त्यांनी सांगितले. 2008 च्या अंडर-19 विश्वचषका दरम्यानही ते सिद्ध झाले होते.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मिळाले कसोटी संघाचे नेतृत्व
विराट कोहलीला गेल्यावर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना कसोटी संघाचे कर्णधारपद मिळाले होते. पहिल्या कसोटीत धोनी जखमी होता. त्यानंतर धोनीचे कसोटी संघात पुनरागमन झाले. पण त्याच सामन्यात धोनीने कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर कोहलीला त्या दौऱ्यासाठी कर्णधार घोषित करण्यात आले.