आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Self Styled Godman Sant Rampal Could Not Arrested

संतविरुद्ध न्यायसंस्था, रामपालविरुद्ध नव्याने अटक वॉरंट, वाचा कोण आहेत रामपाल!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बरवाला (हरियाणा) - हरियाणातील हिसारमध्ये सतलोक आश्रमाचे संचालक बाबा रामपाल यांना आज (सोमवार) कोर्टात हजर करण्यासाठी नेव्ही कमांडो, एसआरपी यांच्यासह 40 हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मात्र पोलिसांना शरण येण्यास रामपाल यांनी स्पष्ट नकार दिला आणि ऐवढ्या मोठ्या फौजफाट्याला रिकाम्या हाताने परतावे लागले आहे. कोर्टात आज त्यांचा वैद्यकीय अहवाल सादर केला जाणार आहे. आश्रमाचे प्रवक्ते राज कपूर म्हणाले, व्हिडिओ कॉन्फ्रंसिंगच्या माध्यमातूनही बाबा हजर राहू शकतात. दुसरीकडे रामपाल यांचे अटक वाँरट असताना त्यांना कोर्टात हजर करु न शकल्यामुळे डीजीपी एस.एन. वशिष्ठ आणि हरियाणाचे गृहसचिव पी.के. महापात्रा यांना कोर्टात हजर राहावे लागणार आहे.
काय आहे प्रकरण
आर्य समाज आणि बाबा रामपाल यांच्यात एका वादानंतर आर्य समाजाने सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले होते. कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली होती. 12 मे 2013 रोजी नाराज आर्य समाजी आणि बाबा रामपाल यांच्या समर्थकांमध्ये वाद उफाळून आला आणि हाणामारी झाली. यात तीन लोकांचा मृत्यू झाला आणि जवळपास 100 हून अधिक लोक जखमी झाले. या प्रकरणी संत रामपाल यांना पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात आज सुनावणीला हजर राहायचे होते.
5 नोव्हेंबर रोजी पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने रामपाल यांचे अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. 10 नोव्हेंबर रोजी त्यांना कोर्टात हजर होणे बंधनकारक होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत ते गैरहजर राहिले. या सुनावणी दरम्यान कोर्टाने पोलिस प्रशासनाला खडे बोल सुनावले आणि 17 नोव्हेंबरला कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले.
त्यानंतर बरवाला येथील रामपाल यांच्या आश्रमाबाहेर मोठ्या संख्येने पोलिस बळ तैनात करण्यात आले. रामपाल यांना अटक करण्यासाठी अनेक योजना तयार करण्यात आल्या. आश्रमाची हवाई पाहणी करण्यात आली. आश्रमाला एखाद्या किल्ल्याप्रमाणे पोलिसांनी वेढा टाकला. आश्रमात जाणारे मार्ग बंद करण्यात आले. वीज-पाणी कनेक्शन तोडण्यात आले. एवढेच नाही, तर फळ-भाजीपाला, दुध यांचा पुरवठा बंद करण्यात आला. रामपाल यांच्या अटकेसाठी 40 जवान तैनात करण्यात आले. मात्र रविवारी वरिष्ठ पोलिस अधिकारी कारवाई न करताच हिसारला परतले.
आश्रमाच्या तीन अटी
आश्रमाचे प्रवक्ते राज कपूर यांनी रामपाल यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते कोर्टात हजर राहाणार नसल्याचे सांगितले. सोमवारी त्यांचा वैद्यकीय अहवाल कोर्टात सादर केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली.

पुढील स्लाइडमध्ये, कोण आहे संत रामपाल आणि काय आहे कबीरपंथ