आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Selfie With Mufflerman : AAP's Mission For Fund Raising

Selfie with Mufflerman : केजरीवाल यांच्याबरोबर फोटो काढा 500 रुपयांत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेंगळुरू - आम आदमी पार्टीच्या कर्नाटक युनिटने दिल्ली निवडणुकांसाठी निधी गोळा करण्यासाठी एक नवी पद्धत अवलंबली आहे. पक्षाने 'सेल्फी विथ मफलरमॅन' कँपेन सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार 500 रुपयांचा निधी देणा-या निवडक 25 जणांना अरविंद केजरीवाल यांच्याबरोबर 11 जानेवारीला नाश्ता करण्याची आणि सेल्फी काढण्याची संधी मिळणार आहे.

7 जानेवारीपर्यंत आम आदमी पार्टीच्या वेबसाईटवर 500 रुपयांचे डोनेशन देऊन यासाठी नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर लकी ड्रॉच्या माध्यमातून 25 जणांची निवड केली जाणार आहे. 11 जानेवारीला केजरीवाल बंगळुरूला जात आहेत. त्यावेळी या विजेत्यांना त्यांना भेटता येईल. तसेच त्यांच्याबरोबर नाश्ता आणि सेल्फी काढण्याची संधी मिळेल. गेल्यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर मुख्यमंत्री बनल्यानंतर अरविंद केजरीवाल नेहमी मफलर बांधलेले आढळून येत होते. त्यानंतर 19 दिवस ट्वीटरवर 'मफलरमॅन' शब्द ट्रेंडींगमध्ये होता.

आपचे नेते आणि बेंगळुरू सेंट्रलमधून लोकसभा निवडणूक लढवलेले व्ही बालकृष्णन यांनी सांगितले की, आम्ही निधी गोळा करण्यासाठी विविध पद्धतीचा अवलंब करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही सेल्फी विथ मफलरमॅन नावाचे कँपेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आपण सगळेच बॅटमॅन आणि सुपरमॅनला ओळखतो. पण आपल्या देशात मफलरमॅनची धूम आहे. मफलरमैन देशाला भ्रष्टाचारापासून मुक्त करेल आणि राजकारणात पारदर्शकता आणेल.

आज दिल्लीत लंच
केजरीवाल रविवारी दिल्लीच्या ग्रेटर कैलाश येथील पंचशील पार्कमध्ये निधी गोळा करण्यासाठी नागरिकांबरोबर लंच करणार आहेत. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून 10 हजार रुपये घेतले जात आहेत. या लंचमध्ये 100 जण सहभागी होतील, अशी अपेक्षा पक्षाला आहे.