आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Semi Nude Protest In Uttar Pradesh Legislative Assembly

युपी विधानसभेत आमदारांनी चक्‍क उतरविले शर्ट; जम्मू-काश्मीरमध्ये आमदारांचे गैरवर्तन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर देशात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तेलंगणा विधेयक संसदेत मंगळवारी प्रचंड गदारोळात मंजूर झाले. मात्र, दुसर्‍या दिवशीही संसदेत यावरून गदारोळ सुरुच आहे. आंध्र प्रदेशच्या विभाजनास विरोध करणारे आंध्रचे मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी यांनी राजीनामा द‍िला आहे. याशिवाय रेड्डी यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठीही दिली आहे. दुसरीकडे उत्तरप्रदेश विधानसभेत आमदारांनी चक्क कपडे काढून आंदोलन छेडले आहे. विधाससभेत आमदारांनी शर्ट उतरवून सभागृहात आंदोलन केले. त्याचबरोबर जम्मू काश्मीर विधानसभेच्या एका आमदाराने अधिकार्‍याच्या कानशिलात वाजवल्याचे वृत्त आहे.

युपी विधानसभेचे आजपासून (बुधवार) हंगामी बजेट सत्र सुरु झाले. सकाळी कामकाज सुरु होताच विरोधी पक्ष रालोदच्या आमदारांनी सभागृहात प्रवेश करून शर्ट काढून आंदोलन केले. राज्यपाल बी. एल. जोशी यांनी सरकारच्या चुकांवर पांघरूण घातले असल्याचा आरोप बसप, भाजप आणि रालोदच्या आमदारांनी केला आहे.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करून समाजवादी पक्ष सत्तेवर आल्यापासून युपीत पुन्हा 'जंगलराज' सुरु झाल्याचा बसपने आरोप केला. सभेचे कामकाज सुरु होताच भाजप आणि बसपच्या आमदारांनी सरकार विरोधात पोस्टर-बॅनर दाखवून जोरदार घोषणाबाजी केली. राज्यपालांचे भाषण सुरु असताना बसप, भाजप आणि रालोदच्या आमदारांनी प्रचंड गदारोळ केला. आमदारांचे गैरवर्तन पाहून राज्यपालांनी अभिभाषणाचे संक्षिप्त वाचन करून सभागृहाचा त्याग केला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष माता प्रसाद पांडेय यांनी सभेचे कामकाज तहकूब केल्याची घोषणा केली.

दुसरीकडे, जम्मू-कश्मीर विधानसभेत आज (बुधवार) रेशनच्या मुद्यांवर चांगलीच खडाजंगी झाली. पुलवामाचे आमदार सईद बशर यांनी पीडितांना रेशनपासून वंचित राहावे लागत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. आमदार बशर यांना सभागृहातून बाहेर नेत असताना त्यांना एका मार्शलच्या कानशिलात वाजवली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी जम्मू-कश्मीर विधानसभेत झालेल्या धक्काबुक्कीत एक आमदार जखमी झाले होते.