आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थान: IAS सालोदियांनी स्‍वीकारला इस्‍लाम, म्‍हटले- हिंदू धर्मात झाला माझ्यासोबत भेदभाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्रकार परिषद झाल्‍यानंतर जाताना उमराव सालोदिया - Divya Marathi
पत्रकार परिषद झाल्‍यानंतर जाताना उमराव सालोदिया
जयपूर - राजस्थानचे वरिष्‍ठ आयएसआएस अधिकारी उमराव सालोदिया यांनी हिंदू धर्माचा त्‍याग करत इस्‍लाम धर्म स्‍वीकारला, त्‍यांनी स्‍वत:च आज (गुरुवार) एका पत्रकार परिषदेमध्‍ये याची माहिती दिली. एवढेच नाही तर सालोदियाऐवजी आता खान हे अडनाव धारण केले. सहा महिन्‍यानंतर ते भारतीय सेवेतून निवृत्‍त होणार आहेत.
का सोडला हिंदू धर्म ?
सालोदियांनी पत्रकार परिषदेमध्‍ये म्‍हटले, ''मी दलित असल्‍याने हिंदू धर्मात माझ्यावर अन्‍याय केला गेला. मला मुख्‍य सचिव बनवले गेले नाही. मस्‍लीम धर्मात असा भेदभाव नाही.''


मीडियाला लिहिलेल्‍या पत्रात काय म्‍हटले ?
- त्‍यांनी मीडियाला लिहिलेल्‍या पत्रात म्‍हटले,
भारतीय संविधानाच्‍या कलम 25 (1) नुसार भारतीय नागरिकाला कोणत्‍याही धर्माचा स्‍वीकार करता येतो.
- मी यानुसार आज, 31 डिसेंबर 2015 ला हिंदू धर्म सोडून इस्‍लाम धर्म स्‍वीकारत आहे.
सरकारची प्रतिक्रिया
- राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया म्‍हणाले, कुणी कोणत्‍या धर्माला मानतो हा ज्‍याचा त्‍याचा प्रश्‍न आहे. त्‍या बद्दल आमचे काहीच म्‍हणणे नाही. परंतु, सालोदियांची पद्धत चुकीची आहे.
- त्‍यांच्‍या सारख्‍या ज्‍येष्‍ठ अधिकाऱ्याला हे शोभत नाही. नोकरीचे केवळ सहा महिने शिल्‍लक आहेत. हा निर्णय योग्‍य नाही.
कोण आहेत उमराव सालोदिया?
- 1978 बॅचचे आयएएस सालोदिया जयपूरचे राहणारे आहेत.
- सध्‍या ते राजस्थान रोडवेजचे अध्‍यक्ष आहेत.
- यापूर्वी ते जवाहर कला केंद्राचे संचालक, वाहतूक आणि महसूल अतिरिक्त मुख्य सचिव होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...