(फोटो: आरोपी आणि केरळचे पोलिस महानिरीक्षक टी.जे.जोस)
कोची- केरळचे पोलिस महानिरीक्षक टी.जे.जोस यांच्यावर परीक्षेत कॉपी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, लॉच्या एका पेपरला पोलिस महानिरीक्षक जोस यांना कॉपी करताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. एवढेच नव्हे तर संबंधित इन्स्ट्रक्टरने जोस यांना परीक्षा हॉलबाहेर काढले होते. घटना कलामस्सेरी येथील सेंट पॉल कॉलेजातील आहे.
दुसरीकडे, त्रिशूर रेंजचे पोलिस महानिरीक्षक टी.जे.जोसने कॉपी केल्याचा आरोप फेटाळला आहे. जोस यांनी 'मास्टर ऑफ लॉ'च्या एका पेपरला कॉपी केली होती. टेक्स्ट बुक बेंचवर ठेवून जोस पेपर लिहत होते. तेव्हा इन्स्ट्रक्टरने जोस यांना कॉपी करताना रंगेहाथ पकडले होते. शिक्षा म्हणून जोस यांना हॉल बाहेर हाकलून दिले होते.
या प्रकरणाची कॉलेजच्या प्राचार्यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी महात्मा गांधी युनिव्हर्सिटीच्या कुलगुरुंना पत्र पाठवून जोस यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे. जोस यांनी चूक कबूल केल्यास त्यांना माफ करण्यात येईल, असे युनिव्हर्सिटीच्या सूत्रांनी म्हटले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो