आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची बंगळुरुत गोळ्या झाडून हत्‍या, सोशल मीडियावर तीव्र निषेध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळूरू - उजव्या विचारसरणीविरोधात सातत्याने लिखाण करणाऱ्या जेष्ठ पत्रकार, संपादक गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. राजराजेश्वरी नगर येथील त्यांच्या राहत्या घरात मंगळवारी रात्री घुसून चार ते पाच हल्लेखोरांनी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडल्या. बंगळूरू पोलिस आयुक्तांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. पोलिसातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. माध्यमातील वृत्तानुसार गोरी यांच्यावर 3 वेळा गोळ्या झाडण्यात आल्या. गौरी लंकेश कन्नड वृत्तपत्र ‘लंकेश पत्रिका’ प्रकाशित करत होत्या. 
 
बंगळूरूचे डीसीपी वेस्ट एम एन अनुचेत यांनी सांगितले की, गौरी लंकेश यांच्या राहत्या घराववर संध्याकाळी हल्लेखोरांनी गोळीबार केला, त्या आता या जगात नाहीत. त्याचा मृतदेह सापडला आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये गौरी लंकेश यांना मानहानी प्रकरणात न्यायालयाने 6 महिन्‍यांची शिक्षा सुनावली होती. परंतु, गौरी यांना जामिन मिळाला होता. धारवाड येथील भाजप खासदार प्रल्हाद जोशी आणि पक्षाचे नेते उमेश दुशी यांनी गौरी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. हा खटला २००८ मध्ये गौरी लंकेश यांच्या वृत्तपत्रात छापलेल्या एका लेखावर दाखल करण्यात आला होता.
 
भाजप नेत्याने केली होती केस....
- धारवाड येथील भाजप खासदार प्रल्हाद जोशी आणि पक्षाचे नेते उमेश दुशी यांनी गौरी यांच्या विरोधात मानहानिचा केस दाखल केली होती.
- ही केस 2008 मध्ये गौरी लंकेश यांच्या वृत्तपत्रात छापलेल्या एका लेखावर दाखल करण्यात आली होती.
 
सत्याचा आवाज दाबला जाऊ शकत नाही - राहुल गांधी 
गौरी लंकेश यांच्या हत्येचा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. ते म्हणाले, 'सत्याचा आवाज कधीच दाबले जाऊ शकत नाही. मात्र दुर्दैव हे आहे की संघ आणि भाजप विचारधारेकडून सत्य दडपण्याचा प्रयत्न होत आहे. हा भारत देश आहे, येथे सत्य कधीच दडपले जाऊ शकत नाही. भले कितीही लोकांना तुम्ही ठार मारा.'
गौरी यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगत राहुल म्हणाले, 'केवळ काँग्रेसच नाही, संपूर्ण देश लंकेश यांच्या कुटुंबियांच्यासोबत आहे.' 
 
लेखकांच्‍या हत्‍येच्‍या आठवणी पुन्‍हा एकदा ताज्‍या
गौरी लंकेश यांच्‍या हत्‍येमुळे मागील काही वर्षांमध्‍ये झालेल्‍या पुरोगामी लेखकांच्‍या हत्‍येच्‍या आठवणी पुन्‍हा एकदा ताज्‍या झाल्‍या आहेत. 2015 मध्‍ये कर्नाटकमध्‍येच लेखक कलबुर्गी यांची अशाच प्रकार गोळ्या घालुन हत्‍या करण्‍यात आली. त्‍याचवर्षी कोल्‍हापूरमध्‍ये कम्‍युनिस्‍ट विचारवंत गोविंद पानसरे आणि 2013मध्‍ये अंधश्रध्‍देविरोधात लढाई करणारे नरेंद्र दाभोळकर यांची गोळ्या घालुन हत्‍या करण्‍यात आली होती. 
 
गौरी लंकेश यांच्‍या हत्‍येचा सोशल मीडियावर तीव्र निषेध करण्‍यात येत आहे. पुढील स्‍लाइडवर वाचा, मान्‍यवरांच्‍या प्रतिक्रिया... 
 
हेही वाचा,
बातम्या आणखी आहेत...